नाशिक : नाशिकच्या महानगर पालिका सातपूर विभागीय कार्यालय येथे बांधकाम विभागात मिस्त्री म्हणून नेमणूक असलेल्या विलास गावले यांनी बांधकाम विभागाच्या शेड येथे दोरीच्या सहाय्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याच्या खिशात सुसाईड नोट देखील आढळून आले असून, सातपूर पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.
अमोल गावले यांच्या आत्महत्या करण्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. घटनेची माहिती मिळताच त्यांचे मित्र परिवार आणि नातेवाईक यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली होती. संबंधित विभागाच्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून गावले यांच्या आत्महत्या प्रकरणी कुठलेही स्पष्टीकरण देण्यात आले नसून,सातपूर पोलिस ठाणे अंतर्गत अधिक तपास सुरू आहे.त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी ,पत्नी ,आई भाऊ, बहीण असा परिवार आहे.अत्यंत मनमिळावू आणि कोणाच्याही दुःखात अडचणीमध्ये धावून जाणारे असा त्यांचा स्वभाव असल्याचे मित्र परिवार यांच्याकडून सांगण्यात येत आहे.
आत्महत्या केलेल्या मनपा कर्मचारी यांच्या खिशात सापडली सुसाइड नोट
"मी स्वतःहून हे कृत्य करत आहे यात कोणाचाही दोष नाही मला माफ करा" अशी सुसाइड नोट लिहून मयत मनपा कर्मचारी विलास गावले यांनी लिहून ठेवली होती.आता नेमकी ही आत्महत्या करण्यामागचे कारण काय याबाबत सातपूर पोलिस अधिक तपास करत आहे.
Web Summary : Nashik municipal employee Vilas Gavale committed suicide at the Satpur office. A suicide note was found, stating he was responsible and asking for forgiveness. The reason for the suicide is unclear, and police are investigating. He is survived by his family.
Web Summary : नाशिक के सतपुर कार्यालय में मनपा कर्मचारी विलास गावले ने आत्महत्या की। एक सुसाइड नोट मिला, जिसमें उन्होंने जिम्मेदारी ली और माफी मांगी। आत्महत्या का कारण अस्पष्ट है, और पुलिस जांच कर रही है। उनके परिवार में पत्नी, बच्चे और माता-पिता हैं।