शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 06:38 IST

या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट यंत्राचा वापर केला जाणार नसून मतदार यादीतही बदल होणार नसल्याची माहिती राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

नाशिकरोड : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बार दिवाळीनंतर उडणार आहे. महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुका एकत्रित होणार नसून, त्या टप्प्याटप्प्याने होणार आहेत. कोणती निवडणूक आधी होईल, कोणती नंतर हे अद्याप निश्चित नाही. या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट यंत्राचा वापर केला जाणार नसून मतदार यादीतही बदल होणार नसल्याची माहिती राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

विभागीय आयुक्त कार्यालयात मंगळवारी दुपारी निवडणूक आयुक्त वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक विभागाची निवडणूकपूर्व आढावा बैठक पार पडली. यावेळी राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम उपस्थित होते. यावेळी वाघमारे यांनी दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात येतील, असे स्पष्ट करताना महापालिकेची निवडणूक आधी होईल की जिल्हा परिषदेची की पंचायत समित्यांची, हे तेव्हाच जाहीर होईल, असे नमूद केले. मतदानासाठी ईव्हीएम यंत्राचा वापर होणार आहे. परंतु, मतदाराला कोणाला मतदान केले, हे चिठ्ठीस्वरूपात दर्शविणाऱ्या व्हीव्हीपॅट यंत्राचा वापर केला जाणार नाही. व्हीव्हीपॅट यंत्रामुळे मतदान प्रक्रियेस वेळ लागत असल्याने त्याचा वापर केला जाणार नसल्याचे वाघमारे यांनी स्पष्ट केले.

मध्य प्रदेशातून मागवणार २५ हजार ईव्हीएमया निवडणुकीसाठी मध्य प्रदेशमधून २५ हजार मतदान यंत्रे आणली जाणार आहेत. मध्य प्रदेशला लागून असणाऱ्या धुळे, नंदुरबार व अन्य जिल्ह्यांत त्यांचा वापर केला जाणार आहे. याशिवाय निवडणूक आयोगाने नवीन मतदान यंत्रांची मागणी नोंदविली असून, ती ऑक्टोबरपर्यंत प्राप्त होतील, असे आयुक्त वाघमारे यांनी सांगितले.

मतदार यादीत बदल नाहीआगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी मतदार संख्या, मतदान केंद्रे येथील सोयीसुविधा, निवडणूक पार पाडण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र, आदींची तयारी व पूर्वनियोजन करण्याचे निर्देश दिल्याचे वाघमारे यांनी सांगितले. 

स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी १ जुलै २०२५ पर्यंत नावे नोंदविलेली विधानसभेची मतदार यादी वापरण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचे वाघमारे यांनी स्पष्ट केले. यासाठी मुख्य निवडणूक आयोगाची परवानगी मागितली असून, ती लवकरच मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :Electionनिवडणूक 2024NashikनाशिकMaharashtraमहाराष्ट्र