शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोटातील १२ दोषींची निर्दोष मुक्तता, राज्य सरकारला दणका
2
“शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे पळाले”; संजय राऊतांचा दावा, सरकारवर टीका
3
छावा संघटना मारहाण: राष्ट्रवादीचे युवा शाखेचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण फरार; ११ जणांवर गुन्हा दाखल
4
राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाण यांच्यासह ११ जणांवर गुन्हा दाखल; छावा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण प्रकरणी कारवाई
5
हा हल्ला पूर्वनियोजित, सुनील तटकरेंच्या सांगण्यावरून...; विजय घाडगे पाटलांचा मोठा दावा
6
भयानक PHOTO's! ११ जुलै २००६ चा मुंबई लोकल बॉम्बस्फोट; आरोपी निर्दोष सुटले पण... जखमा आजही कायम...
7
छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला मारहाण प्रकरणी सूरज चव्हाण यांनी मागितली माफी, म्हणाले...
8
Vi युझर्ससाठी महत्त्वाची बातमी, स्वस्त रिचार्ज प्लान्समध्ये केले बदल; Airtel आणि Jio काय करणार?
9
IndiGo : विमान ४० मिनिटे हवेत फिरत राहिले, तिरुपतीहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग
10
हनी ट्रॅप प्रकरणात भाजपा नेत्याच्या निकटवर्तीयाला मुंबईत अटक; अनेक मोठी नावे उघड होणार
11
Stock Market Today: किरकोळ तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Bank Nifty सुस्साट, 'या' शेअर्समध्ये तेजी
12
ना साईड बिझनेस, ना शेअर बाजाराच्या टीप्स; ४५ व्या वर्षी ₹४.७ कोटींसोबत होऊ शकता रिटायर, काय आहे ‘सिक्रेट प्लान’
13
तयार रहा...! पेट्रोल, डिझेलच्या किंमती ८-१० रुपयांनी वाढण्याची शक्यता; भारत ट्रम्प यांच्या डोळ्यात खुपतोय...
14
सोनिया गांधींना भेटण्यासाठी जात होतात त्याचे काय? योगेश कदम यांचा उद्धव ठाकरेंना टोला
15
Laxman Hake : "फडणवीसांनी अजितदादांच्या कार्यकर्त्यांना आवर घालावा, नाहीतर तुमचं..."; लक्ष्मण हाके संतापले
16
आरोपीची मिरवणूक काढणाऱ्यांचीच ‘वरात’; पोलिसांनी दाखल केला गुन्हा!
17
वसईतील पर्यटनस्थळांवर पोलिसांचा मनाई आदेश; चिंचोटी, देवकुंडी धबधब्यात जाण्यास पर्यटकांना मज्जाव
18
चातुर्मासातील सलग दुसरा भौम प्रदोष: ‘या’ मंत्रांचा अवश्य जप करा; व्रतातील शिवपूजन कसे कराल?
19
मंगला एक्स्प्रेसमध्ये पकडले ३६ कोटींचे ड्रग्ज; मेथाफेटामाईनसह कोकेनही आढळले!
20
पुण्यात शेजारी शेजारी दोन मॉल, दोन्हींत मुकेश अंबानींच्या रिलायन्स ट्रेन्डस्; यामागचे प्लॅनिंग नेमके असते तरी काय...

पालिका निवडणुकीचे पडघम, विरोधकांनी भरला दम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:18 IST

नितीन बोरसे, सटाणा : पालिका निवडणुकीचे बिगुल वाजले आणि झोपलेले पुढारी जागे झाले अशी अवस्था आज शहराची आहे. निवडणुकीच्या ...

नितीन बोरसे, सटाणा : पालिका निवडणुकीचे बिगुल वाजले आणि झोपलेले पुढारी जागे झाले अशी अवस्था आज शहराची आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मूलभूत सोयी-सुविधांसाठी कोणी उपोषण, कोणी आत्मदहनाचे इशारे देऊन सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करीत आहेत. तर सत्ताधारी विरोधकांचे आरोप खोडण्याचा. ऐन पावसाळ्यात सुरू असलेल्या या चिखलफेकमुळे राजकीय वातावरण तापू लागले आहे.

गेल्या निवडणुकीत सटाणा गावचे ‘सोनवणे’ विखुरले गेल्यामुळे बिगर सोनवणे मंडळीने करिष्मा दाखवला. गेल्या वेळच्या थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत अपक्षासह चार प्रमुख पक्षांनी मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला होता. भाजपच्या वतीने माजी नगराध्यक्ष बाळासाहेब सोनवणे, काँग्रेसकडून विजय पाटील, सेनेकडून अरविंद सोनवणे, राष्ट्रवादीकडून बाळासाहेब रौंदळ तर अपक्ष सुनील मोरे यांनी शहर विकास आघाडी उभी करून आव्हान दिले. वतनदार सोनवणे असलेले तिघे उमेदवार एकाच भाऊकीतले. मराठा चार उमेदवार यांच्या मतविभागणीचा फायदा घेत मोरे यांनी अल्पसंख्याकांची मोट बांधून अलगदपणे पालिकेची सत्ता हस्तगत करून अनेक स्वयंघोषित पुढाऱ्यांची झोप उडविली. त्यानंतर आमनेसामने लढलेल्या भाजपनेदेखील सत्तेचा मोह न टाळता मोरेंशी युती करून सत्तास्थापन केली. गेल्या पावणे पाच वर्षाच्या अनेक वेळा पुलाखालून पाणी वाहून गेले. मोरेंनी भाजपशी केलेल्या युतीचा फायदा घेत शहरासाठी पुनदसारख्या महत्त्वाकांक्षी पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. ही योजना आता अंतिम टप्प्यात आहे. रिंग रोड, देवमामलेदार यशवंतराव महाराज स्मारक अशा भरीव कामांना निधी पदरात पाडून घेतला. असे असताना भाजपाच्या काही नगरसेवकांनी आपल्याला विश्वासात घेत नसल्याचा आरोप करून बगावत करण्याचा प्रयत्न केला. आजच्या घडीला त्यांनी मोरेंशी काडीमोड घेतला. आगामी निवडणुकीत हीच मंडळी मोरेंसाठी डोकेदुखी ठरणार आहे.

विरोधकांकडून मोरेंची नाकेबंदी..

शहर पाणीपुरवठा योजनेच्या वाढीव खर्चाबाबत शासनाच्या मुन्फ्रामार्फत कर्ज उभारणीच्या प्रस्तावावरून राष्ट्रवादी काँग्रेसने नगराध्यक्ष मोरे यांना लक्ष केले आहे . हा प्रस्ताव बेकायदेशीर असून तो रद्द करून संबंधित कामाची चौकशी करावी या मागणीसाठी करून कोंडी केली आहे. राष्ट्रवादीच्या नगरसेविका सुरेखा बच्छाव, भाजपाचे आरिफ शेख यांनी आपल्या प्रभागात मूलभूत सुविधा पुरविल्या जात नसल्याने त्यांनी उपोषणाचे हत्यार उपसून मोरे यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले. राज्यात सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांची आघाडी असली तरी आगामी काळात प्रत्येक पक्षातील महत्त्वाकांक्षी कार्यकर्त्यांमुळे आजच्या घडीला तरी आघाडीची शक्यता कमी आहे. तर सुनील मोरे यांनी पुन्हा शहर विकास आघाडीचा नारा दिला आहे. त्यामुळे भाजपला आपली स्वतंत्र ताकद दाखवावी लागणार आहे. त्यामुळे आगामी काळात पंचरंगी लढत अटळ आहे.

कोट...

गेल्या पावणे पाच वर्षात माझ्या शहरवासीयांना दिलेल्या जाहीरनाम्याची पूर्तता केल्याचा मला आनंद आहे. पुनद पाणीपुरवठा योजना, रिंग रोड, देवमामलेदार यशवंतराव महाराज स्मारक, नानानानी पार्क ही भरीव कामे पूर्ण केले आहे. आगामी काळात शहराचा कायापालट करण्यासाठी विविध योजना राबविल्या जातील.

- सुनील मोरे, नगराध्यक्ष

कोट....

मागच्या काळात मंजूर झालेली ही कामे असल्यामुळे कोणी त्याचे श्रेय घेऊ नये. शहरात डासांचे साम्राज्य असल्यामुळे डेंग्यू, चिकुनगुनियासारख्या आजरांनी थैमान घातले आहे. याला पालिका प्रशासन जबाबदार आहे.

- राहुल पाटील, विरोधी पक्षनेते

फोटो- २७ राहुल पाटील

२७ सटाणा पालिका

270821\27nsk_12_27082021_13.jpg~270821\27nsk_13_27082021_13.jpg

२७ सटाणा पालिका ~फोटो- २७ राहूल पाटील