शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेत आयुक्तांची माफी मागण्याचे नाट्य?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 00:45 IST

अविश्वास ठरावामुळे दुखावलेले महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची माफी मागण्यासाठी स्थायी समितीच्या काही सदस्यांनी केलेला प्रयत्न अखेर फसला. विरोधीपक्षातील सदस्यांनी विरोध केल्याने शनिवारी (दि.१५) काही सदस्यांनीच आयुक्तांची भेट घेतली.

नाशिक : अविश्वास ठरावामुळे दुखावलेले महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची माफी मागण्यासाठी स्थायी समितीच्या काही सदस्यांनी केलेला प्रयत्न अखेर फसला. विरोधीपक्षातील सदस्यांनी विरोध केल्याने शनिवारी (दि.१५) काही सदस्यांनीच आयुक्तांची भेट घेतली. अर्थात, सभापती हिमगौरी आडके यांनी नगरसेवकांचा स्वेच्छाधिकार निधी वाढवून द्यावा यासाठी ही भेट असल्याचे सांगून माफीनाम्याचा इन्कार केला आहे.  गेल्या महिन्याच्या अखेरीस आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर अविश्वास ठराव मांडण्यात आला होता. त्यासाठी स्थायी समितीच्या सदस्यांना विशेषाधिकार असल्याने तब्बल पंधरा सदस्यांच्या सह्या घेऊन महापौरांना निवेदन दिले होते. त्यानुसार १ सप्टेंबर रोजी विशेष महासभा बोलविण्यात आली होती. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांनी हस्तक्षेप केल्याने हा अविश्वास ठराव बारगळला. मुख्यमंत्र्यांच्या आदेशामुळे सदस्यांना माघार घेण्याची नामुष्की आली. या प्रकारानंतर आयुक्त तुकाराम मुंढे यांची माफी मागण्यासाठी भाजपाच्या वतीने पुढाकार घेण्यात आला. विशेषत: सभापती हिमगौरी आडके यांच्या वतीने पुढाकार घेऊन शनिवारी (दि.१५) सकाळी साडेअकरा वाजता आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या भेटीची वेळ घेण्यात आली होती. त्यासंदर्भात सभापतींनी सदस्यांना मोबाइलवर मॅसेज करून आपले ठरल्याप्रमाणे आयुक्तांची वेळ घेतली आहे, असे कळविल्यानंतर विरोधी पक्षांच्या काही सदस्यांनी आक्षेप घेतला आणि कोणाचे कधी ठरले अशी विचारणा करतानाच आयुक्तांच्या माफीनाम्यास साफ विरोध केला आणि जाण्याचे टाळले.या दरम्यानही समितीच्या सभापतींसह काही सदस्यांनी आयुक्तांची भेट घेतली आणि ही भेट केवळ नगरसेवकांच्या स्वेच्छाधिकार निधीसाठी असल्याचा दावा करण्यात आला. विशेषत: सभापती हिमगौरी आडके यांनी त्यास माफी नाट्याच्या प्रकाराचा इन्कार केला असून, नगरसेवक निधीवरून चर्चा करण्यात आल्याचे सांगितले.माफीनामा: दिनकर पाटील यांचा नकार१२७ नगरसेवक हे सदस्य अत्यंत स्वाभिमानी असून, ते आयुक्त तुकाराम मुंढेच काय, परंतु अन्य कोणाचीदेखील माफी मागणार नाही, असा विश्वास सभागृहनेता दिनकर पाटील यांनी व्यक्त केला आहे. स्थायी समितीचे सदस्य आयुक्तांना भेटले असतील मात्र ते अन्य कामांसाठी माफीसाठी कधीही भेटणार नाही असे त्यांनी पत्रकात म्हटले आहे. नाशिकमध्ये शहराध्यक्षाच्या नेतृत्वाखाली भाजपा सुनियोजित विकास करीत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाtukaram mundheतुकाराम मुंढे