शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

मलब्याच्या पुनर्वापरासाठी मनपाला दोन निविदा प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2020 00:20 IST

नाशिक : केंद्र शासनाच्या स्वच्छ शहर सर्वेक्षण मोहिमेअंर्तगत नाशिक महापालिकेला टॉप फाइव्हमधील क्रमांक हुकण्यास कारणीभूत ठरलेल्या बांधकामाचे निरूपयोगी साहित्य म्हणजेच सिमेंटच्या मलब्याचा पुनर्वापर करण्यासाठी दोन निविदा प्राप्त झाल्या आहेत.

ठळक मुद्देस्वच्छ शहर सर्वेक्षण । टॉप फाइव्हसाठी मोर्चेबांधणी सुरू

नाशिक : केंद्र शासनाच्या स्वच्छ शहर सर्वेक्षण मोहिमेअंर्तगत नाशिक महापालिकेला टॉप फाइव्हमधील क्रमांक हुकण्यास कारणीभूत ठरलेल्या बांधकामाचे निरूपयोगी साहित्य म्हणजेच सिमेंटच्या मलब्याचा पुनर्वापर करण्यासाठी दोन निविदा प्राप्त झाल्या आहेत.या प्रकल्पाच्या माध्यमातून महापालिकेला शासनाकडून साडेसात कोटी रुपयांपर्यंत अनुदान मिळण्याची शक्यता आहे. केंद्र शासनाच्या स्वच्छ शहर सर्वेक्षणात अनेक निकषांपैकी एक महत्त्वाचा निकष बांधकामांचे निरूपयोगी सिमेंट-वाळूच्या साहित्याचा पुनर्वापर करण्यासाठी प्रक्रिया करणे आवश्यक आहे. सध्या बांधकाम साहित्याच्या पुनर्वापराचा कोणताही प्रकल्प नाही. महापालिकेच्या वतीने खड्डे किंवा खाणी बुजवण्यासाठी लॅँड फिल म्हणून या निरूपयोगी साहित्याचा वापर केला जातो. महापालिकेने या अगोदरच निविदा मागवल्या होत्या. मात्र, त्यात केंद्र आणि राज्य शासनाने बदल केले. अशा प्रकारच्या साहित्याचा पुनर्वापर (रिसायकल) करणारा प्रकल्प उभारल्यास साडेसात कोटी रुपयांपर्यंत अनुदान मिळू शकते, असे नव्या आदेशात नमूद केले आहे. ई-कचऱ्यासाठी निविदानाशिक शहरात आता ई-कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठीदेखील महापालिका निविदा मागविण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी सहाही विभागात मोबाइल, बॅटरी, संगणक आणि अन्य इलेक्ट्रॉनिक साहित्य जमविण्यासाठी कलेक्शन सेंटर सुरू करण्यात येणार असून, तेथून हा ई-कचरा ठेकेदार पुनर्वापर करण्यासाठी नेईल. लवकरच त्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या वतीने अशाप्रकारचा प्रकल्प साकारण्यामुळे स्वच्छ शहर सर्वेक्षणात नाशिकला अधिक गुण मिळणार आहेत. शिवाय अनेक ठिकाणी खुल्या भूखंडावर किंवा पडीक प्लॉटवर अशा प्रकारे साहित्य फेकण्याच्या प्रकारांना आळा बसणार आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाHealthआरोग्य