शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेने पाणीपट्टी वसुलीचे उद्दिष्ट ओलांडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 01:11 IST

महापालिकेने पहिल्यांदाच पाणीपट्टी वसुलीचे उद्दिष्ट ओलांडले आहे. आतापर्यंत ४२ कोटी ३५ लाख रुपये पाणीपट्टी वसूल झाली असून, गतवर्षी याचदरम्यान, २६ कोटी २१ लाख रुपये वसुली झालेली होती. ३१ मार्चअखेर त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, घरपट्टी वसुलीतही महापालिकेने जोर लावल्याने आतापर्यंत ८७ कोटी रुपये वसुली झाल्याची माहिती उपआयुक्त रोहिदास दोरकुळकर यांनी दिली.

नाशिक : महापालिकेने पहिल्यांदाच पाणीपट्टी वसुलीचे उद्दिष्ट ओलांडले आहे. आतापर्यंत ४२ कोटी ३५ लाख रुपये पाणीपट्टी वसूल झाली असून, गतवर्षी याचदरम्यान, २६ कोटी २१ लाख रुपये वसुली झालेली होती. ३१ मार्चअखेर त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.दरम्यान,  घरपट्टी वसुलीतही महापालिकेने जोर लावल्याने आतापर्यंत ८७ कोटी रुपये वसुली झाल्याची माहिती उपआयुक्त रोहिदास दोरकुळकर यांनी दिली. महापालिकेने सन २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी ४१ कोटी रुपये पाणीपट्टी वसुलीचे उद्दिष्ट समोर ठेवले होते. यंदा कर विभागाकडून पाणीपट्टीकडे विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. गेल्या एक-दीड वर्षापासून रखडलेल्या पाणीबिलांचे वाटप करण्यावर भर दिला. याशिवाय, अनधिकृत नळजोडणीधारकांवरही कारवाई सुरू केली. आतापर्यंत ४२ कोटी ३५ लाख रुपये पाणीपट्टी वसुली झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल १६ कोटी १४ लाख रुपये जादा वसुली झाली आहे. पहिल्यांदाच महापालिकेच्या कर विभागाला दिलेले उद्दिष्ट पार झाले आहे. येत्या ३१ मार्चअखेर त्यात आणखी भर पडण्याची शक्यता आहे. पाणीपट्टीबरोबरच महापालिकेने घरपट्टी वसुलीतही गत वर्षाच्या तुलनेत प्रगती केल्याचे दिसून येते. आतापर्यंत ८७ कोटी ३९ लाख रुपये घरपट्टी वसुली झाली आहे. मागील वर्षी ८१ कोटी १३ लाख रुपये घरपट्टी वसुली झालेली होती. मागील वर्षाच्या तुलनेत वसुलीच्या टक्केवारीत ५ टक्क्यांनी वाढ झालेली आहे. सन २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी कर विभागाला घरपट्टी वसुलीचे उद्दिष्ट ११० कोटी रुपये देण्यात आले आहे.जप्तीची मोहीम वेगातमहापालिकेने सहाही विभागांत घरपट्टी थकबाकीदारांविरुद्ध जप्तीच्या मोहिमेला वेग दिला आहे. घरपट्टी थकबाकीदारांना नोटिसा बजावण्यात आल्यानंतर अनेकांच्या मिळकती जप्त करून त्यांचा लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. यामध्ये बऱ्याच मोठ्या थकबाकीदारांचा समावेश आहे. महापालिकेच्या या मोहिमेमुळे काही मिळकतधारकांकडून थकबाकीचा भरणा करण्यासाठी प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, ३१ मार्चपर्यंत रकमेचा भरणा करता यावा यासाठी सुटीच्या दिवशीही कार्यालय सुरू ठेवण्यात आल्याची माहिती कर विभागाकडून देण्यात आली आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाWaterपाणी