शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेचे अंदाजपत्रक 2173 कोटींवर

By admin | Updated: June 24, 2017 00:30 IST

नाशिक : महापालिका महासभेने स्थायी समितीने सादर केलेल्या १७९९.३० कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकात आणखी ३७४.०६ कोटी रुपयांची भर घातल्याने अंतिम अंदाजपत्रक २१७३ कोटींवर जाऊन पोहोचले आहे

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : महापालिका महासभेने स्थायी समितीने सादर केलेल्या १७९९.३० कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकात आणखी ३७४.०६ कोटी रुपयांची भर घातल्याने अंतिम अंदाजपत्रक २१७३ कोटींवर जाऊन पोहोचले आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असतानाही मागील वर्षाच्या तुलनेत महासभेने यंदा ४११.८४ कोटी रुपयांनी भर घातली आहे. त्यामुळे जमा आणि खर्च बाजू पाहता अंदाजपत्रकातील तरतुदींची अंमलबजावणी करताना प्रशासनाची कसोटी लागणार आहे.सन २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी १४१०.०७ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर केले होते. त्यानंतर स्थायी समितीने त्यात ३८९ कोटी रुपयांची भर घातल्याने अंदाजपत्रक १७९९.३० कोटींवर जाऊन पोहोचले होते. स्थायी समितीने महासभेला अंदाजपत्रक सादर केल्यानंतर महापौरांनी प्राप्त सूचना-उपसूचनांच्या आधारे अंदाजपत्रकात आणखी ३७४.०६ कोटी रुपयांची भर घातल्याने अंतिम अंदाजपत्रक अखेर २१७३.३६ कोटींवर थांबले आहे. त्याबाबतचा महासभेचा ठराव नुकताच नगरसचिव विभागाला प्राप्त झाला असला तरी त्यात आणखी काही लेखाशीर्षाखाली भर घालण्याची तयारी महापौरांकडून सुरूच आहे. महासभेने नगरसेवक निधी म्हणून प्रत्येकी ७५ लाख रुपयांची तरतूद केलेली आहे.  याशिवाय, खेडे विकास निधीसाठी १० कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे तर महापौर निधीसाठी ५ कोटी, उपमहापौर व स्थायी समिती सभापतीसाठी प्रत्येकी ३ कोटी, सभागृहनेत्यासाठी २ कोटी, विरोधीपक्षनेत्यासाठी १ कोटी, प्रभाग समिती सभापतींसाठी प्रत्येकी ५० लाख रुपये तर महिला बालकल्याण समिती सभापतीकरिता ५० लाख रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. कामांची निकड व सदस्यांच्या सूचना विचारात घेऊन कामांचे प्रस्ताव मान्य करण्याच्या सूचना अंदाजपत्रकात महासभेने प्रशासनाला केल्या आहेत. याचबरोबर एका लेखाशीर्षाखाली रक्कम दुसऱ्या लेखाशीर्षात वर्ग करण्यासाठी आयुक्तांना अधिकार प्रदान करण्यात आले आहे. ग्रंथयात्रेसाठी ३६ लाखांची तरतूदमहासभेने ग्रंथयात्रेसाठी ३६ लाख रुपयांची तरतूद केलेली आहे. मागील पंचवार्षिक काळात तत्कालीन उपमहापौर गुरुमित बग्गा व नगरसेवक शाहू खैरे यांनी ग्रंथयात्रेचा उपक्रम राबविण्यासाठी बरेच प्रयत्न केले होते. त्यासाठी २५ लाख रुपयांची तरतूदही करण्यात आली होती. परंतु, निवडणूक आचारसंहितेमुळे ग्रंथयात्रेला मुहूर्त लाभू शकला नव्हता. मात्र, आता सत्तेवर आलेल्या भाजपाने त्यासाठी ३६ लाखांची तरतूद केली आहे. याशिवाय, रस्ते यांत्रिकी पद्धतीने सफाई करण्यासाठीही ५.२५ कोटींची तरतूद करण्यात आली असून, रस्ते बांधणीसाठी तब्बल ३०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. चार वर्षांतील अंदाजपत्रक (रुपये कोटीत)सन  आयुक्त स्थायी समिती महासभा प्रत्यक्ष जमा२०१४-१५ १८५७.६९ २९६५.६९ ३०४३.६९ ९६७.०३२०१५-१६ १४३७.६७ १७६९.९७ २१७९.९७ ११३२.८४२०१६-१७ १३५७.९६ १७३७.९६ १७६१.५२ १४०२.४६२०१७-१८ १४१०.०७ १७९९.३० २१७३.३६ ———-