शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

महापालिका : चौकशी पूर्ण; संबंधित चौघांनाही बजावल्या नोटिसा अधिकाºयांवर दोषारोप सिद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 01:20 IST

नाशिक : महापालिकेत विविध प्रकरणांतील गैरव्यवहारांवरून चौकशीच्या फेºयात अडकलेल्या चौघा अधिकाºयांवरील दोषारोप सिद्ध झाले असून, चौकशी पूर्ण होऊन संबंधितांना दहा दिवसांत स्पष्टीकरण देण्यासंदर्भात अंतिम नोटिसा बजावल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे.

ठळक मुद्देप्रलंबित असलेल्या या चौकशांची प्रक्रिया तत्काळ पूर्ण करण्याचे आदेश प्रशासनात साफसफाई मोहीम सुरू केली

नाशिक : महापालिकेत विविध प्रकरणांतील गैरव्यवहारांवरून चौकशीच्या फेºयात अडकलेल्या चौघा अधिकाºयांवरील दोषारोप सिद्ध झाले असून, चौकशी पूर्ण होऊन संबंधितांना दहा दिवसांत स्पष्टीकरण देण्यासंदर्भात अंतिम नोटिसा बजावल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या या चौकशांची प्रक्रिया तत्काळ पूर्ण करण्याचे आदेश दिल्यानंतर चौकशी अहवालात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्याचे समजते. त्यामुळे चौघा अधिकाºयांवर गंडांतर येऊ घातले आहे.महापालिकेत गेल्या दीड-दोन वर्षांपासून सुमारे ११ अधिकारी व कर्मचारी यांच्याविरुद्ध झालेल्या आरोपप्रकरणी चौकशी प्रलंबित होती. या अकरा प्रकरणांची चौकशी करण्यासाठी एकच निवृत्त अधिकारी नियुक्त केलेला होता. तुकाराम मुंढे यांनी दि. ८ फेबु्रवारीला आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी प्रशासनात साफसफाई मोहीम सुरू केली. काही अधिकाºयांचे खातेपालट केले. त्यात मुख्य लेखा परीक्षक महेश बच्छाव यांच्याकडे प्रशासनाचा अतिरिक्त कार्यभार सोपवितानाच दीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या चौकशांचा महिनाभराच्या आत निपटारा करण्याचेही आदेश दिले. त्यानुसार गेल्या १५ दिवसांपासून चौकशांच्या फायलींवर अभ्यास सुरू होता. त्यात निलंबित उद्यान अधीक्षक गो. बा. पाटील, निवृत्त अधीक्षक अभियंता (यांत्रिकी) आर. के. पवार, अग्निशमन दलाचे प्रमुख अनिल महाजन आणि मायको दवाखान्यातील निवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ. हिरामण कोकणी यांच्यावरील दोषारोप सिद्ध झाल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे. चौकशी अधिकाºयांनी चौघाही अधिकाºयांना तीन दिवसांपूर्वीच अंतिम नोटीस बजावली आहे. दहा दिवसांत त्यांनी आपले लेखी म्हणणे मांडायचे आहे. त्यानंतर आयुक्त त्यावर आपला निर्णय घेतील. आयुक्तांकडून संबंधितांना सुनावण्यात येणाºया शास्तीचा प्रस्ताव महासभेपुढे जाणार आहे. अशावेळी दोषारोप सिद्ध झालेल्या अधिकाºयांबाबत महासभेची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. चौघा अधिकाºयांमध्ये अग्निशमन दलाचे प्रमुख अनिल महाजन यांची निवृत्ती काही महिन्यांवर येऊन ठेपलेली आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारला त्याचदिवशी अनिल महाजन हे गणवेशात न आल्याने मुंढे यांनी त्यांना दणका दिला होता. त्यामुळे महाजन यांच्याबाबतीत होणाºया निर्णयाकडेही लक्ष लागून असणार आहे.