शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात लष्करी हद्दीभोवती बांधकामासाठी निर्बंध नसल्याच्या दाव्यावर महापालिका आयुक्त ठाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 15:12 IST

राज्य शासनाचेच संदर्भ: तिढा वाढण्याची शक्यता

ठळक मुद्देमहापालिका किंवा राज्य शासन डिफेन्स वर्क अ‍ॅक्टचा भंग करू शकत नसल्याचे पत्रराज्य सरकारच्या संदर्भीय आदेशांच्या प्रतींचे पुरावेही मागविले

नाशिक : लष्करी हद्दीभोवती बांधकामासाठी कोणतेही निर्बंध नसल्याने नव्या बांधकामांना परवानगी देण्याच्या पत्रावर महापालिकेचे आयुक्त अभिषेक कृष्ण ठाम आहेत. त्यासंदर्भात योग्य ती कार्यवाही होईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. दुसरीकडे निर्बंध असेल तर महापालिकेने पाठविलेल्या बांधकाम प्रकरणांना अद्याप कमांडंट परवानगी देत नसल्याने विकासकांची कोंडी कायम आहे तर या विषयावर न्यायालयीन लढाईचा मार्ग मोकळा असून, आता तेथेच उभय यंत्रणांनी भूमिका स्पष्ट करावी असे मत याचिकाकर्ता शिवाजी सहाणे यांनी व्यक्तकेले आहे.लष्करी हद्दीच्या परिघात इमारत बांधकामांना निर्बंध घालणारे मार्गदर्शक परिपत्रक संरक्षण खात्याने २०११ मध्ये प्रसिद्ध केले. त्याविषयी अनेक खासदारांनी हरकती घेतल्याने पुन्हा स्पष्टीकरण देणारे पत्रक २०१६ मध्ये निर्गमित केले. त्यात ज्या शहराची नावे दिलीत त्यात नाशिकचा समावेश नाही. तथापि, महापालिकेने मात्र लष्करी हद्दीपासून पाचशे मीटर अंतराच्या परिघातील सर्व परवानग्या थांबवल्या आहेत. लष्कराकडे १५ प्रकरणे ना हरकत दाखल्यासाठी पाठविण्यात आली. परंतु निर्बंध असतील त्यावर कोणतेही प्रत्युत्तर लष्कराकडून मिळत नसल्याने सर्वच प्रकरणे रखडली आहेत. यासंदर्भात केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्यापर्यंत हा विषय गेल्यानंतर आणि राज्य शासनाकडे लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा केल्यानंतर गेल्याच आठवड्यात महापालिका आयुक्तअभिषेक कृष्णा यांनी निर्बंध नसल्याचा निर्वाळा दिला असून तसे पत्र देवळाली येथील कमांडंट यांना पाठविले आहे, तर त्यांनी प्रत्युत्तरात निर्बंध असल्याचा दावा केला असून, महापालिका किंवा राज्य शासन डिफेन्स वर्क अ‍ॅक्टचा भंग करू शकत नसल्याचे पत्र दिले आहे. राज्य सरकारच्या संदर्भीय आदेशांच्या प्रतींचे पुरावेही मागविले आहेत. यासंदर्भात आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी राज्य सरकारच्या आदेशानुसारच पत्र दिल्याचे सांगितले.दरम्यान, लष्कर अधिकारी आणि महापालिका यांच्या पत्रापत्रीत विकासकांची अडचण झाली आहे. येथील विकासक अ‍ॅड. शिवाजी सहाणे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, आता न्यायालयातच दोन्ही यंत्रणांनी बाजू मांडावी आणि स्पष्टीकरण द्यावे, अशी भूमिका घेतली आहे. दोन यंत्रणांच्या समन्वयाअभावी नागरिकांना अकारण अडवणे योग्य नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.१५ प्रकरणे प्रलंबितलष्करी निर्बंध असल्याच्या २०११च्या परिपत्रकानंतर महापालिकेने येथील बांधकाम विकासाच्या परवानग्याच दिलेल्या नाहीत. एकूण पंधरा प्रकरणे संबंधित अधिका-यांकडे ना हरकत दाखल्यासाठी पाठविण्यात आलेली आहेत. त्यानुसार हरकतही देण्यात येत नाही आणि ना हरकत दाखलाही दिला जात नाही.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका