शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेचे अंदाजपत्रक लांबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 00:38 IST

महापालिका आयुक्तांकडून दरवर्षी फेबु्रवारीच्या २० तारखेच्या आत आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर करणे आवश्यक असते. परंतु, २० तारीख उलटून गेल्यानंतरही अद्याप अंदाजपत्रक सादर झालेले नाही.

नाशिक : महापालिका आयुक्तांकडून दरवर्षी फेबु्रवारीच्या २० तारखेच्या आत आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर करणे आवश्यक असते. परंतु, २० तारीख उलटून गेल्यानंतरही अद्याप अंदाजपत्रक सादर झालेले नाही. माजी आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी अंतिम केलेले अंदाजपत्रक नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सुधारित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे स्थायी समितीवर नव्याने आरूढ होणाºया सभापतीलाच मार्चमध्ये अंदाजपत्रक सादर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.  सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक तयार करत माजी आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी ते छपाईसाठी पाठविले होते. सदर अंदाजपत्रक हे १४७५ कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता कृष्ण यांनीच बोलून दाखविली होती. स्थायी समितीने यंदा अंदाजपत्रक हे जानेवारी महिन्यातच सादर करण्यासाठी प्रशासनाकडे लकडा लावला होता. परंतु, फेब्रुवारीच्या दुसºया आठवड्यात अंदाजपत्रक सादर केले जाईल, असे लेखा विभागामार्फत सांगितले जात होते. दरम्यान, अभिषेक कृष्ण यांची बदली झाली आणि तुकाराम मुंढे यांनी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला. मुंढे यांनी अंदाजपत्रकाबाबत पुन्हा एकदा सर्व खातेप्रमुखांच्या बैठकावर बैठका घेत अजेंडा समजून सांगितला. आपल्या त्रिसूत्रीनुसार अंदाजपत्रकात तरतुदी करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे, लेखा विभागामार्फत पुन्हा आकडेमोड केली जात आहे.  येत्या २८ फेबु्रवारीला स्थायीवरील निवृत्त झालेल्या आठ सदस्यांच्या रिक्त जागांवर नवीन सदस्यांची नियुक्ती विशेष महासभेत होणार आहे. त्यानंतर, ५ ते ७ मार्च या कालावधीत नवीन सभापतिपदासाठी निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, आयुक्तांकडून नवीन सभापतींकडेच अंदाजपत्रक सादर केले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अंदाजपत्रक तयार करण्याचे काम सुरू असून, अद्याप तारीख ठरली नसल्याचे स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका