शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

आज महापालिकेचे अंदाजपत्रक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 01:29 IST

महापालिकेचे सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे मंगळवारी (दि.२०) दुपारी २ वाजता होणाऱ्या महासभेत सादर करणार आहे. सव्वा महिन्यापूर्वी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारणाºया तुकाराम मुंढे यांच्या अंदाजपत्रकाविषयी नगरसेवकांसह नाशिककरांचीही उत्सुकता असून, गेल्या महिनाभरापासून घेतलेल्या निर्णयांचे प्रतिबिंब अंदाजपत्रकात उमटण्याची शक्यता आहे.

नाशिक : महापालिकेचे सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे मंगळवारी (दि.२०) दुपारी २ वाजता होणाऱ्या महासभेत सादर करणार आहे. सव्वा महिन्यापूर्वी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारणाºया तुकाराम मुंढे यांच्या अंदाजपत्रकाविषयी नगरसेवकांसह नाशिककरांचीही उत्सुकता असून, गेल्या महिनाभरापासून घेतलेल्या निर्णयांचे प्रतिबिंब अंदाज-पत्रकात उमटण्याची शक्यता आहे.  महापालिकेचे सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक माजी आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी तयार केले होते आणि २८ फेबु्रवारी अखेर ते सादर होण्याची तयारीही सुरू होती. मात्र, ७ फेबु्रवारीला अभिषेक कृष्ण यांची बदली झाली आणि त्यांच्या जागेवर पदभार स्वीकारणाºया तुकाराम मुंढे यांनी अंदाजपत्रकाची नव्याने जुळणी करण्याचा निर्णय घेतला. तत्पूर्वी, अभिषेक कृष्ण यांनी १४५१ कोटी रुपयांचे सुधारित आणि १४७५ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर करणार होते. त्यात त्यांनी घरपट्टी १४ टक्के, तर पाणीपट्टीत ५ टक्के दरवाढ प्रस्तावित केलेली होती. याशिवाय सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात भांडवली कामांसाठी फारसा वाव राहणार नसल्याचे सूतोवाच करत प्रलंबित कामांनाच गती देण्याचा मनोदय बोलून दाखविला होता. मात्र, तुकाराम मुंढे यांनी अंदाजपत्रक नव्याने सादर करण्याचा निर्णय घेतला आणि गेल्या महिनाभरापासून त्याची तयारी केली. महिनाभरात आपल्या ‘त्रिसूत्री’चा अवलंब करत मुंढे यांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. उत्पन्नाच्या जमा बाजूनुसारच विकासकामे हाती घेण्याची भूमिका मुंढे यांनी घेतली आणि त्या पार्श्वभूमीवर मागील वर्षातील नगरसेवक निधीसह २५७ कोटी रुपयांच्या रस्ते विकासकामांनाही कात्री लावली. त्यामुळे येत्या अंदाजपत्रकात मुंढे यांच्या ‘त्रिसूत्री’चे प्रतिबिंब उमटण्याची शक्यता आहे. मुंढे यांच्या अंदाजपत्रकात नेमके दडलेय काय, याबाबत उत्सुकता ताणली गेली आहे. त्यामुळे मंगळवारी (दि.२०) होणाºया महासभेकडे लक्ष लागून राहिले आहे.महासभेच्या भूमिकेकडे लक्षअंदाजपत्रक स्थायी समितीवर सादर न करता आयुक्तांनी ते थेट महासभेवर सादर करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे मंगळवारी (दि.२०) होणाºया महासभेत सत्ताधारी भाजपाकडून अंदाजपत्रक पुन्हा स्थायीवर पाठविले जाते की, महासभेवरच त्याला अंतिम रूप देते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. सद्यस्थितीत स्थायी समिती गठित झालेली असल्याने स्थायी समितीच्याही भूमिकेकडे लक्ष केंद्रित झाले आहे.शहर बससेवेसाठी तरतूदआयुक्त तुकाराम मुंढे यांनी मार्च २०१९ पर्यंत कोणत्याही परिस्थितीत शहर बससेवा महापालिका ताब्यात घेणार असल्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यामुळे महापालिकेच्या अंदाजपत्रकात बससेवेसाठीही मोठी तरतूद केली जाण्याची शक्यता आहे. परिणामी, अन्य विकासाच्या प्रकल्पांना कात्री लागण्याची चिन्हे आहेत. माजी आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी शहर बससेवेसाठी ७० कोटी रुपयांची तरतूद केली होती.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाBudgetअर्थसंकल्प