शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
5
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
6
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
7
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
8
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
9
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
10
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
12
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
13
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
14
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
15
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
16
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
17
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
19
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया

महापालिका व जिल्हा परिषदेतील सत्ताधाऱ्यांना याच वर्षात करुन दाखवावे लागेल राजकारण सुसाट होताना लोककल्याणाचा धागा तुटू नये !

By किरण अग्रवाल | Updated: January 3, 2021 01:06 IST

कोरोनाने अवघी जीवनशैलीच बदलून ठेवल्याने समाजकारण व राजकारणही एका नव्या वळणावर आणून ठेवले आहे. पुढच्या वर्षात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरे जाताना या वर्षात जे काही राजकारण पहावयास मिळेल ते सामान्यांची अपेक्षापूर्ती करणारे असेल का?

ठळक मुद्देनववर्षात त्यासाठी अधिक जोमाने प्रयत्न करता येतीलआणखी वर्षभराने निवडणुकीला सामोरे जायचे आहेआंदोलने जनतेच्या प्रश्नांसाठी व्हायला हवीत

सारांश

किरण अग्रवाल

जे घडून गेले वा सरले ते सारे आनंददायी असूच शकत नाही; पण म्हणून निराशेचे मळभ मनात ठेवून भविष्यातील वाटचाल करायची नसते. सन २०२० हे वर्ष कोरोनाची काजळ छाया पसरवून राहिल्याने यात फारशी विकासाची पदचिन्हे उभारता आली नसली तरी आता नववर्षात त्यासाठी अधिक जोमाने प्रयत्न करता येतील, फक्त ते करताना माणुसकी व लोककल्याणाचा धागा राजकारणाच्या मुळाशी असावा, अशी अपेक्षा बाळगल्यास ती गैर ठरू नये.

सरलेल्या वर्षातील अधिकतर म्हणजे तब्बल आठ ते नऊ महिन्यांचा काळ हा कोरोनाच्या सावटात गेला, त्यामुळे अवघे समाजमन भीतीच्या छायेत राहिले. यासाठीच्या लढाईत आरोग्याचा विषय प्राधान्याचा बनल्याने विकास काहीसा मागे पडला हे खरे; पण आता या संकटावर मात केली गेल्याचे चित्र असल्याने नवीन वर्षात दुप्पट वेगाने विकासाकडे लक्ष पुरविण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांवर व त्यातील सत्ताधाऱ्यांवर येऊन पडली आहे. विशेषतः २०२२ या वर्षाच्या प्रारंभीच नाशिक महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुका होऊ घातल्या असल्याने चालू वर्ष हे पूर्णतः त्यासंबंधीच्या तयारीचे, मशागतीचे व सुसाट राजकारणाचे राहणार आहे, त्यादृष्टीने जे काही करायचे ते याच वर्षात संबंधितांना करून दाखवावे लागणार आहे.

राज्यातील राजकारण एका नव्या वळणाने प्रवाहित झाले असताना कोरोना पुढे आला, त्यामुळे मध्यंतरीचा काळ काहीसा शांततेचा गेला; परंतु आता राजकीय धुमश्‍चक्री दिवसेंदिवस वेग घेऊ पाहात आहे. त्याचे परिणाम स्थानिक पातळीवरही उमटणे सुरू झाले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीवगळता भाजप, शिवसेना व मनसेतही सांधेबदल झाले आहेत त्यामुळे नवीन पदाधिकारी जोमाने कामाला लागले आहेत. आणखी वर्षभराने निवडणुकीला सामोरे जायचे आहे; त्यासाठी करुन दाखवावे लागेल, पण हे दाखवताना राजकारणासाठी राजकारण न करता लोककल्याणाचा हेतू ठेवून माणुसकीच्या नात्याने कामे होणे अपेक्षित आहे.

सरत्या वर्षाच्या अखेरीस काही मान्यवरांची पक्षांतरे घडून आलीत तर नववर्षाच्या निमित्ताने काहींच्या मिसळ पार्ट्यांची व त्यातील राजकारणाची चर्चा रंगली. हे यापुढेही होत जात राहील, पण त्यामागे तुमचा हेतू काय आहे हे आता महत्त्वाचे ठरेल कारण मतदारही आता सुज्ञ झाला आहे. नाशकात महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या वेळी खूप मोठ्या प्रमाणात पक्षांतर झाले होते, त्यानंतर सत्तेतही बदल झाला; परंतु पुढील काळात या बदलाचा जनमानसावर परिणाम होताना काही दिसून आला नाही. तेव्हा व्यक्तिगत परिणामासाठी होणारी पक्षांतरे व लोककल्याणासाठी केले जाणारे प्रयत्न हे मतदारांना ओळखू यायला लागले आहेत याची जाणीव संबंधितांना ठेवावी लागेल. राज्यातील सत्ताधारी पक्षाचे लोक केंद्राच्या अखत्यारितील तर केंद्रात सत्ताधारी असलेल्या पक्षाचे लोक राज्याच्या अखत्यारीतील विषयांवर आंदोलने करतात तेव्हा त्यातील पक्षीय अभिनिवेश लपून राहात नाही. आंदोलने जनतेच्या प्रश्नांसाठी व्हायला हवीत, आपल्या राजकारणासाठी नव्हे अशी प्रगल्भता नवीन वर्षात राजकारण्यांकडून दाखविली गेली तर ते समाधानाचे ठरेल, अन्यथा कॅलेंडर बदललेले असले तरी स्थिती बदलणार नाही. तसे होणार नाही याचा संकल्प या नववर्षात संबंधितांनी करावा इतकेच!पक्षांतर्गत स्थिती बदलण्याचीच गरज...कोरोनाच्या भीतीने माणसाला माणसापासून दूर केले; पण आता कालची कथा आणि व्यथा विसरून नव्या वर्षात नवी नाती घडवायची आहेत. नव्या शैलीने समाजकारण व राजकारणही विकसित करायचे आहे. त्यासाठी लोकमत आजमावताना सर्वच पक्षांना अगोदर स्वपक्षातील स्थितीत सुधारणा करावी लागेल. स्थानिक पातळीवरही कोणत्याही पक्षात एकमुखी किंवा सर्वमान्य असे नेतृत्व आढळत नाही, सर्वच पक्षात दुही माजलेली दिसून येते. मतभिन्नता कुटुंबातही असते तसे राजकारणातही गट-तट असतातच; परंतु ते पक्षासाठी नुकसानदायी ठरेपर्यंत राजकारण खेळले जायला नको.

टॅग्स :New Yearनववर्ष