शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मुंढे साहेब गो बॅक...हॉकर्स, टपरीधारकांचा ‘आक्रोश मोर्चा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 14:42 IST

महापालिकेवर धडक : एकतर्फी हॉकर्स झोन रद्दची मागणी

ठळक मुद्दे भालेकर मैदानापासून सुरू झालेल्या या मोर्चात मोठ्या संख्येने हॉकर्स-टपरीधारक सहभागी झाले होतेभाजपा नेते सुनील बागुल यांनी तिखट शब्दांत आयुक्तांचा समाचार घेतला

नाशिक : महापालिकेने शहरात रस्त्यांवर व्यवसाय करणा-या विक्रेत्यांविरुद्ध सुरू केलेल्या अतिक्रमण विरोधी मोहिमेच्या निषेधार्थ सर्व पक्षीय हॉकर्स-टपरीधारक कृती समितीच्या वतीने महापालिकेवर ‘जन आक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. यावेळी, आयुक्तांना देण्यात आलेल्या निवेदनात एकतर्फी करण्यात आलेले हॉकर्स झोन रद्द करण्याची मागणी करण्यात आली.हॉकर्स-टपरीधारक कृती समितीच्या वतीने भाजपाचे नेते सुनील बागुल, शिवसेनेचे शिवाजी भोर, पिपल्स रिपाइंचे शशिकांत उन्हवणे, भाजपाचे नवनाथ ढगे, सय्यद युनूस, श्रमिक हॉकर्स सेनेचे संदीप जाधव, अजय बागुल व हॉकर्स युनियनच्या पुष्पा वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेच्या राजीव गांधी भवनवर ‘जन आक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. भालेकर मैदानापासून सुरू झालेल्या या मोर्चात मोठ्या संख्येने हॉकर्स-टपरीधारक सहभागी झाले होते. महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी कृती समितीच्या नेत्यांची भाषणे झाली. त्यानंतर आयुक्तांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे, महापालिकेने कुठलेही नियोजन न करता हॉकर्स झोन निश्चित केले आहेत. मात्र, या हॉकर्स झोनला सर्वांचा तीव्र विरोध आहे. २३ जून २०१७ रोजी महापौरांकडे झालेल्या बैठकीत फेरीवाला संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत चर्चा करून विभागीय अधिकाºयांनी झोनबाबत विचारविनिमय करावा, असे ठरले असतानाही, एकतर्फी झोन तयार करून फेरीवाल्यांवर कारवाई केली जात आहे. दबाव तंत्राचा अवलंब करून पोलिसांत गुन्हे दाखल करण्याची धमकीही दिली जात आहे. शहरातील फेरीवाल्यांची पर्यायी व्यवस्था होईपर्यंत अतिक्रमण विरोधी मोहीम थांबवावी, शहर फेरीवाला समिती गठीत करावी तसेच घरपट्टीत केलेली दरवाढ रद्द करावी आदी मागण्याही या निवेदनात करण्यात आल्या आहेत.मुंढेविरोधी घोेषणाबाजीमोर्चात नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. याशिवाय, ‘मुंढे साहेब, गो बॅक...’चे फलकही लक्ष वेधून घेत होते. महापालिकेसमोर झालेल्या जाहीर सभेत वक्त्यांनी मुंढे यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. भाजपा नेते सुनील बागुल यांनी तिखट शब्दांत आयुक्तांचा समाचार घेतला. दहा वर्षांत ज्या माणसाच्या तेरा वेळा बदल्या होतात, याचा अर्थ आयुक्त सक्षम नसल्याची टीकाही बागुल यांनी केली. 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाtukaram mundheतुकाराम मुंढे