शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

मुंढे यांना नाट्य कलावंतांकडून ‘अल्टिमेटम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 00:53 IST

शहरातील महाकवी कालिदास कलामंदिराच्या वास्तूचे नूतनीकरण व अद्ययावत सोयी-सुविधा उपलब्ध क रून देण्यात आल्या आहेत; मात्र याचा उपभोग घेण्यासाठी कलावंतांसह नाशिककरांना अव्वाच्या सवा भाडेवाड परवडणारी नाही;

नाशिक : शहरातील महाकवी कालिदास कलामंदिराच्या वास्तूचे नूतनीकरण व अद्ययावत सोयी-सुविधा उपलब्ध क रून देण्यात आल्या आहेत; मात्र याचा उपभोग घेण्यासाठी कलावंतांसहनाशिककरांना अव्वाच्या सवा भाडेवाड परवडणारी नाही; त्यामुळे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी याबाबत तातडीने निर्णय घेऊन जुने दर व नियमावली कायम ठेवावी, अशी मागणी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेने केली आहे. मुंढे यांना याबाबत निवेदन देण्यात येणार असून, तीन दिवसांमध्ये निर्णय प्रशासनाकडून घेतला गेला नाही, तर तीव्र आंदोलन उभारण्याच्या पावित्र्यात कलावंत आहे.  मराठी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेच्या कार्यालयात मंगळवारी (दि.२५) संध्याकाळी अध्यक्ष रवींद्र कदम, उपाध्यक्ष शाहू खैरे यांच्या नेतृत्वाखाली बैठक घेण्यात आली. या मागणीचे निवेदन महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, स्थायी समिती सभापती व सर्वपक्षीय गटनेत्यांना कलावंत देणार आहे.या निवेदनानंतर तीन दिवसांमध्ये भाडेवाढ व नियमावलीसंदर्भात सकारात्मक निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन उभारण्याबाबतची भूमिका बैठकीत घेतली गेली. नव्याने करण्यात आलेली भाडेवाढ पूर्णत: रद्द  करण्यात यावी आणि शहराच्या सांस्कृतिक जडणघडणीला हातभार लावावा, असे कलावंतांनी पत्रात म्हटले आहे. याप्रसंगी प्रमुख  कार्यवाह सुनील ढगे, रवींद्र ढवळे, सुनील परमार यांसह आदी कलावंत उपस्थित होते.  बैठकीत कालिदासच्या भाडेवाढीचा तीव्र निषेध नोंदविण्यात आला. तसेच कालिदासची नियमावलीदेखील अत्यंत जाचक स्वरूपाची असून, जुने दर व नियम कायम करून नाशिककर रसिकांना व कलावंतांना प्रशासनाने दिलासा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाartकलाNashikनाशिक