शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

मुंबईच्या तोतया आयपीएस अधिकाऱ्याने नाशिकमध्ये व्यावसायिकांना घातला लाखोंचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 17:31 IST

नाशिकला ‘मुन्नाभाई आयपीएस’ याने पुन्हा शरणपूररोड परिसरातील एक तारांकित हॉटेलमध्ये वास्तव्य केले. दरम्यान, जगप्रसाद यांनी त्याच्यासोबत असलेल्या सय्यद नामक चालकाशी संवाद साधला असता त्याने सांगितले की माझे साडेतीन लाखांचे टॅक्सीभाडे थकले आहे, नाशिकला देतो, असे सांगून त्याने मला सोबत आणले. यानंतर दोघांची फसवणूक अमितसिंग याने केल्याची त्यांच्या लक्षात आले.

ठळक मुद्देमुन्नाभाई आपीएस’च्या शहरातून मुसक्या आवळल्या अमितसिंग याने कमरेला पिस्तूलही लावलेले होते

नाशिक : आयपीएस अधिकारी असल्याचे सांगून मुलुंडच्या एका भामट्याने चक्क नाशिकच्या तारांकित हॉटेलचालकांसह टॅक्सीसेवा पुरविणाºया खासगी कंपनीच्या चालकांना लाखो रुपयांना गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी ‘मुन्नाभाई आपीएस’च्या शहरातून मुसक्या आवळल्या आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मुलुंड येथील रहिवासी व मूळचा उत्तर प्रदेशचा निवासी असलेला अमित अंबिका सिंग (२५) याने एका खासगी सेवा पुरविणा-या टॅक्सी कंपनीकडे आॅनलाइन बुकिंग करून चालक जगप्रसाद रामदिन मोरयाच्या (३७, रा.ग्रॅन्टरोड, मुंबई) ताब्यातील कार (एम.एच.०१ सीजे ४७४४) घेत मुंबईहून नाशिकच्या दिशेने १६ मार्च रोजी निघाला. यावेळी अमितसिंग याने कमरेला पिस्तूलही लावलेले होते, असे फिर्यादित जगप्रसाद यांनी म्हटले आहे. महामार्गावरील एका तारांकित हॉटेलमध्ये अमितसिंग याने संध्याकाळी तीन दिवसांसाठी रुम घेतली. तेथे वास्तव्य केल्यानंतर त्याने १८ मार्च रोजी जगप्रसाद यास शिर्डीला घेऊन जाण्यास सांगितले, तेथून एक कोटी रुपये एका साहेबाकडून घ्यावयाचे आहे, असा बहाणा केला. तत्पूर्वी शहरातील चांडक सर्कल येथील एका हॉटेलमध्ये दोन दिवस अमितसिंग याने रुम घेऊन मुक्काम ठोकला. त्यानंतर शिर्डीच्या दिशने टॅक्सीतून अमितसिंग मार्गस्थ झाला. मुंबई येथून त्याच्यासोबत वसीम सय्यद नावाचा इसमही आला होता; त्याने त्यास हा माझा चालक आहे, अशी ओळख जगप्रसाद यांना करून दिली होती. जगप्रसाद या दोघांना घेऊन शिर्डीला पोहचले. यावेळी त्यांनी गाडीभाडे मागितले, मात्र अमितसिंग याने नकार देत एक कोटी रुपयांचे दोन खोके डिक्कीत ठेवलेले आहे, त्यामधून पैसे काढणे शक्य नसल्याचे सांगत दहा हजार रुपये उसनवार घेतले.

अशी पटली फसवणुकीची खात्रीनाशिकला ‘मुन्नाभाई आयपीएस’ याने पुन्हा शरणपूररोड परिसरातील एक तारांकित हॉटेलमध्ये वास्तव्य केले. दरम्यान, जगप्रसाद यांनी त्याच्यासोबत असलेल्या सय्यद नामक चालकाशी संवाद साधला असता त्याने सांगितले की माझे साडेतीन लाखांचे टॅक्सीभाडे थकले आहे, नाशिकला देतो, असे सांगून त्याने मला सोबत आणले. यानंतर दोघांची फसवणूक अमितसिंग याने केल्याची त्यांच्या लक्षात आले. जगप्रसाद यांनी कुठलाही विलंब न करता थेट सरकारवाडा पोलीस ठाणे गाठून संशयित तोतया आयपीएस अधिकारी अमितसिंगविरुद्ध फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून तपासचक्रे फिरवत नवीन मध्यवर्ती बसस्थानकातून ‘मुन्नाभाई आयपीएस’ यास बेड्या ठोकल्या.

टॅग्स :Nashikनाशिकnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयArrestअटक