नाशिक : उच्च न्यायालयाने वड प्रजातीची झाडे तोडण्यास मनाई केली असतानाही महापालिकेने मुंबईनाका परिसरातील अनधिकृत धार्मिक स्थळ हटविण्याच्या कारवाईदरम्यान, येथील धार्मिक स्थळापासून काही फुटांवर असलेल्या वडाच्या वृक्षावरही बुलडोझर चालविला. वटवृक्ष पाडल्यामुळे नागरिकांसह वृक्षप्रेमींनी पालिकेच्या या कारवाईचा निषेध नोंदविला आहे. सदर वटवृक्ष हा वाहतुकीला अडथळा ठरणारा नव्हता, असे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे.महापालिकेची अनधिकृत धार्मिक स्थळ हटाव मोहिमेचा शेवट शनिवारी (दि.१८) झाला. यावेळी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास मुंबईनाकावरील अनधिकृत धार्मिक स्थळ हटविल्यानंतर पालिकेच्या जेसीबीचालकांनी येथील वटवृक्षही जमीनदोस्त केला. या वटवृक्षाच्या बाबतीत पालिकेने वृक्ष प्राधिकरण समितीपुढे कुठलाही प्रस्ताव मांडलेला नव्हता. एकूणच हा वटवृक्ष तोडण्याबाबतची कुठलीही परवानगी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडे नव्हती; मात्र तरीदेखील पालिकेच्या पथकाने वटवृक्षावर जेसीबी फिरविल्याने संताप व्यक्त होत आहे. महापालिकेकडून अनधिकृत धार्मिक स्थळ हटवून एकीकडे न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी केली, तर दुसरीकडे पालिकेला उच्च न्यायालयाने वृक्ष संवर्धनाबाबत दिलेल्या आदेशाचा विसर पडल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. वड प्रजातीची वृक्ष न्यायालयाच्या आदेशानंतरच हटविली जावी, असे असतानाही पालिकेकडून येथील वडाचे झाड तोडण्यात आले.उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी न्यायालयात दाद मागणार असल्याचे मानव उत्थान मंचाचे जगबीर सिंग यांनी सांगितले. ...तर ‘दिल्ली’ दूर नाही !वटवृक्ष हा हवेतील प्रदूषण रोखण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतो. या भागातून दिवस-रात्र हजारो वाहनांची ये-जा असते. त्यामुळे वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होते. या प्रदूषणाची तीव्रता कमी करण्यासाठी वटवृक्षाची भूमिका महत्त्वाची ठरत होती; मात्र महापालिकेच्या अधिकाºयांनी कुठलाही विचार न करता थेट वटवृक्षावर जेसीबी फिरविला. अशाप्रकारे भारतीय प्रजातीच्या वृक्षांची कत्तल शहरात होत राहिली तर ‘दिल्ली’ दूर नाही !
मुंबईनाका : अतिक्रमण निर्मूलन पथकाचा प्रतापवटवृक्षावर पालिकेने चालविला बुलडोझर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 01:12 IST
नाशिक : उच्च न्यायालयाने वड प्रजातीची झाडे तोडण्यास मनाई केली असतानाही महापालिकेने मुंबईनाका परिसरातील अनधिकृत धार्मिक स्थळ हटविण्याच्या कारवाईदरम्यान, येथील धार्मिक स्थळापासून काही फुटांवर असलेल्या वडाच्या वृक्षावरही बुलडोझर चालविला. वटवृक्ष पाडल्यामुळे नागरिकांसह वृक्षप्रेमींनी पालिकेच्या या कारवाईचा निषेध नोंदविला आहे. सदर वटवृक्ष हा वाहतुकीला अडथळा ठरणारा नव्हता, असे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे.
मुंबईनाका : अतिक्रमण निर्मूलन पथकाचा प्रतापवटवृक्षावर पालिकेने चालविला बुलडोझर
ठळक मुद्देमुंबईनाका : अतिक्रमण निर्मूलन पथकाचा प्रतापवटवृक्षावर पालिकेने चालविला बुलडोझरभारतीय प्रजातीच्या वृक्षांची कत्तल शहरात होत राहिली तर ‘दिल्ली’ दूर नाही !