घोटी : मुंबईहुन नासिककडे जाणाऱ्या साई भक्तांच्या क्वालिस वाहनालागुरूवारी ( दि. ११ ) रात्री ३ च्या सुमारास रायगडनगर जवळ वालदेवी पुलावरविरु द्ध दिशेने येणा-या दुचाकीमुळे गंभीर अपघात झाला. यामध्ये एक साईभक्त जागीच ठार झाला. अपघातग्रस्त सात गंभीर जखमींना नरेंद्राचार्य संस्थानच्या मोफत रु ग्णवाहिकेने दवाखान्यात दाखल करून त्यांना वेळेत उपचार मिळाल्याने त्यांचे प्राण वाचले. गुरु वारी रात्री तीन च्या सुमारास मुंबईहून नाशिककडे साईभक्तांचे क्वालिस वाहन क्र . एमएच ०४ एवाय ९३९१ जात होते. यावेळी समोरून विरु द्ध दिशेने येणारी दुचाकी क्र . एमएच १५ एफआर ०२९० अचानक समोर आली. त्यांना वाचवण्याच्या नादात दोन्ही वाहनांचा अपघात झाला. क्वालिस वाहनातील अविशेख शरद परब (२६) रा. परेल मुंबई हा युवक जागीच ठार झाला. या अपघाताची माहिती मिळताच जगद्गुरू नरेंद्राचार्य संस्थानच्या मोफत रु ग्णवाहिकेचे रु ग्णमित्र निवृत्ती गुंड यांनी अपघातग्रस्तांना नाशिकच्या शासकीय रु ग्णालयात दाखल केले. वेळेत उपचार मिळाल्यामुळे जखमींचे प्राण वाचले. जखमी साईभक्तांत सिध्देश सुभाष कळसुलकर (२७) , अभिनय सर्जेराव भोसले (२०), अभय भरत पंचाल (२१), अजित अशोक सावंत (२९) सर्व राहणार परेल मुंबई यांचा समावेश आहे. दुचाकीवरील भाऊसाहेब जाधव (३८), गोरख शेजवळ (३९) रा पाथर्डी नाशिक हे दोघेही जखमी झाले आहेत. वाडीवºहे पोलिसांनी अपघाताची नोंद घेतली असून पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला आहे.
मुंबईच्या साईभक्तांच्या वाहनाला अपघात ; एक ठार तर सात गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 12:28 IST