शहरं
Join us  
Trending Stories
1
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
2
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान
3
एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; अमित शाहांशी बैठकीत काय चर्चा झाली? खुद्द उपमुख्यमंत्री म्हणाले...
4
आधार ओटीपी वापरून ITRचं ई-व्हेरिफिकेशन करा, अन्यथा रिटर्न अवैध ठरेल; पाहा संपूर्ण प्रोसेस
5
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
6
'कायद्याच्या कचाट्यात महादेवी हत्तीला अडकवू नका, ... तोपर्यंत लढा सुरूच राहणार'; राजू शेट्टींनी स्पष्टच सांगितलं
7
वॉशिंग मशिन वापरताना ‘ही’ किरकोळ चूक जीवावर बेतली; तरुणाचा मृत्यू; करायला गेला एक आणि..
8
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
9
Wasim Jaffer: वसीम जाफरवर मोठी जबाबदारी, आता विदर्भातील खेळाडूंना शिकवतील फलंदाजीचे धडे!
10
ICC Test Ranking : मियाँ 'मॅजिक'नंतर 'मार मुसंडी' शो! सिराजला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
11
ITR आणि टॅक्स डेडलाईनमध्ये काय फरक आहे? शेवटची तारीख कधी? ५,००० दंडापासून वाचण्यासाठी लगेच वाचा!
12
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
13
"आधी माझ्या बायकोला वाचवा...."; पुरात अडकलेल्या नवऱ्याची धडपड, जिंकली लोकांची मनं
14
एकटं बसलं होतं जोडपं, पाठीमागून २ युवक आले; गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला, त्यानंतर जे घडलं...
15
तो 'सोंगाड्या'! DSP सिराजसंदर्भात नेमकं काय म्हणाला जो रुट?
16
'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचा उद्या साखरपुडा, मेहंदीचा व्हिडीओ आला समोर
17
दिल्लीसह देशभरातील वीज ग्राहकांना बसणार ‘शॉक’, वीजदरात वाढ करण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी
18
इराणमध्ये मोठे राजकीय फेरबदल; 'सुप्रीम लीडर'ने कट्टरपंथी विरोधी नेत्याला दिली मोठी जबाबदारी
19
एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक; बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...
20
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...

नववीतील तेजसने बनवले बहुपर्यायी फवारणी यंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 00:08 IST

सध्या सोशल मीडियावर जुगाड तंत्रज्ञानाच्या भन्नाट कल्पना पहायला मिळतात. या कल्पना प्रत्यक्षात उतरवता आल्या तर अनेक कामे किती सहज आणि सोपी होतील, असा विचार करून अनेकजण या जुगाड तंत्रज्ञानाचा वापर दैनंदिन कामात करण्यास इच्छुक असतात. असेच जुगाड तंत्रज्ञान शेतीसाठीही अतिशय फायदेशीर ठरू शकते, ही गोष्ट हेरून अमरावती जिल्ह्यातील दिग्रस येथील दीनबाई विद्यालयातील इयत्ता नववीच्या विद्यार्थ्याने टाकाऊ पाईप आणि सायकलचे पार्ट वापरून बहुपर्यायी व बहुउपयोगी फवारणी यंत्र विकसित केले असून, नाशिकमधील जागतिक कृषी महोत्सवात तेजसचे फवारणी यंत्र शेतकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

नाशिक : सध्या सोशल मीडियावर जुगाड तंत्रज्ञानाच्या भन्नाट कल्पना पहायला मिळतात. या कल्पना प्रत्यक्षात उतरवता आल्या तर अनेक कामे किती सहज आणि सोपी होतील, असा विचार करून अनेकजण या जुगाड तंत्रज्ञानाचा वापर दैनंदिन कामात करण्यास इच्छुक असतात. असेच जुगाड तंत्रज्ञान शेतीसाठीही अतिशय फायदेशीर ठरू शकते, ही गोष्ट हेरून अमरावती जिल्ह्यातील दिग्रस येथील दीनबाई विद्यालयातील इयत्ता नववीच्या विद्यार्थ्याने टाकाऊ पाईप आणि सायकलचे पार्ट वापरून बहुपर्यायी व बहुउपयोगी फवारणी यंत्र विकसित केले असून, नाशिकमधील जागतिक कृषी महोत्सवात तेजसचे फवारणी यंत्र शेतकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.  श्री स्वामी समर्थ कृषी विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्टतर्फे डोंगरे वसतिगृहाच्या मैदानावर बुधवार (दि.२५) पासून सुरू असलेल्या कृषी महोत्सवात अमरावती जिल्ह्यातील दिग्रस येथील दीनबाई विद्यालयातील तेजस काळे याने शेतकरी कुटुंबातील असल्याने शेतºयांचे कष्ट आणि समस्या अतिशय जवळून पाहिल्या आहेत. ऐन बहरात असलेल्या पिकावर अचानक किडीचा प्रादुर्भाव होऊन ते भुईसपाट होताना आणि फवारणीमुळे विषबाधा होऊन शेतकºयांना जीव गमवावा लागतानाही कोवळ्या वयात बघितलेल्या तेजसने शेती क्षेत्रात काम करून शेतकºयांचे कष्ट कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यास सुरुवात केली आहे. याच प्रयत्नातून तेजसने सायकलचे जुने टाकाऊ चाक, प्लॅस्टिक कॅन, प्लॅस्टिकचे नळ, टाकाऊ पाईपचे तुकडे, नोझल व पिस्टन सारखे साहित्य वापरून बहुउपयोगी फवारणी यंत्र तयार केले आहे. हे फवारणी यंत्र हाताळण्यास अतिशय सोपे असून महिलाही ते सहज वापरू शकतात. औषधाचा साठाही यंत्रावर फिरवणे शक्य असल्याने फवारणी यंत्र खांद्यावर घेण्याची गरज नाही. त्यामुळे शेतकºयाचे खांद्यावरचे ओझे कमी होऊन त्याची कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार असल्याचे तेजस यंत्राची माहिती देताना सांगतो. शेतकºयाच्या घरात अगदी सहज उपलब्ध होणाºया साहित्यापासून या यंत्राची निर्मिती केली असल्याने त्यासाठी अतिशय कमी खर्च येतो. फवारणी यंत्र शरीरापासून दूर व पुढे ढकलता येणारे असल्याने त्यापासून विषबाधा होण्याची शक्यता कमी असून, यंत्राचा देखभाल व दुरुस्तीचा खर्चही अत्यल्प असलेल्या या यंत्रामुळे कापूस, तूर, द्राक्ष, टमाटा व अन्य पालेभाज्या व फळभाज्यांना एकसारखी फवारणी करणे शक्य असल्याचा विश्वास लहानगा नवसंशोधक तेजस काळे याने व्यक्त केला आहे.शेत राखणीसाठी कटकटी यंत्रपीक कापणीला आले असताना जंगली प्राणी व पक्ष्यांपासून राखणी करण्यासाठी शेतकºयांना डोळ्यात तेल घालून रात्रं-दिवस राखण करावी लागते. ही गोष्ट लक्षात घेऊन जळगावच्या बोदवड तालुक्यातील साळशिंग येथील प्रतापराव देशमुख यांनी जुना पत्र्यापासून बनवलेली फिरकी डब्याला जोडून कटकटी यंत्र तयार केले आहे. हवेच्या वेगाने फिरकी फिरून शेतात डबा वाजवल्याचा आवाज येत असल्याने शेतात उपद्रवी प्राणी-पक्षी फिरकत नसल्याने हे कटकटी यंत्र शेतकºयाचे पीक राखणीसाठी मदत करणारे असल्याचे देशमुख सांगतात.

टॅग्स :Studentविद्यार्थी