शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

नाशिककरांच्या ‘टेक-आॅफ’ला मिळणार मुहूर्त; नाशिक-मुंबई विमानसेवेचा २३तारखेला शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 21:09 IST

केंद्र सरकारने मागील एप्रिल महिन्यात जाहीर केलेल्या उडान योजनेंतर्गत नाशिककरांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. या योजनेद्वारे येत्या २३ तारखेपासून नाशिक येथील ओझर विमानतळावरून मुंबई, पुण्यासाठी विमानसेवा सुरू होणार आहे. सदर विमानसेवा एअर डेक्कन कंपनीमार्फत पुरविली जाणार आहे.

ठळक मुद्दे उडान योजनेंतर्गत नाशिककरांच्या आशा पुन्हा पल्लवित १९ प्रवाशांची क्षमता असलेले विमान नाशिक-मुंबई हवाई सेवेसाठी उपलब्ध विमानसेवा एअर डेक्कन कंपनीमार्फत पुरविली जाणार प्रमुख सहा शहरांसोबत नाशिक ‘एअर कनेक्ट’ होणार

नाशिक : नाशिक येथून अनेकदा मुंबईसाठी विमानसेवा सुरू करण्याचा प्रयत्न केला गेला; मात्र या प्रयत्नाला यश आले नाही. केंद्र सरकारने हवाई संपर्क बळकट करून विविध शहरांना जोडण्यासाठी आणि मध्यमवर्गीयांना परवडणारी हवाई वाहतूक सेवा डोळ्यापुढे ठेवून उडान योजना जाहीर केली. या योजनेंतर्गत नाशिक-मुंबई-पुणे या शहरांसाठी विमानसेवेला मुहूर्त लाभला आहे.नाशिककरांचे विमानाने मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरांत जाण्याचे स्वप्न वारंवार भंगले. सर्वसामान्य नाशिककरांना या दोन्ही शहरांपर्यंत पोहचण्यासाठी अधिक वेळ व पैसा खर्च करावा लागत आहे. विमानसेवेचे प्रयत्न अनेकदा झाले मात्र त्यांना फारसे यश आले नाही. केंद्र सरकारने मागील एप्रिल महिन्यात जाहीर केलेल्या उडान योजनेंतर्गत नाशिककरांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. या योजनेद्वारे येत्या २३ तारखेपासून नाशिक येथील ओझर विमानतळावरून मुंबई, पुण्यासाठी विमानसेवा सुरू होणार आहे. सदर विमानसेवा एअर डेक्कन कंपनीमार्फत पुरविली जाणार आहे. नाशिक-पुणे-मुंबई हा सुवर्ण त्रिकोण मानला जातो, मात्र नाशिक हे या दोन्ही शहरांपासून हवाई संपर्कापासून वंचित राहिले आहे. एअर डेक्कनमार्फत सुरू करण्यात येणा-या या हवाई सेवेच्या माध्यमातून नाशिककर गगनभरारी घेणार आहे. कंपनीच्या वतीने पहिल्या टप्प्यात नाशिक ते मुंबई दरम्यान विमानसेवा सुरू केली जाणार असून, पुण्याला जाणारे प्रवासी व त्यांची विमानसेवेबाबतची मागणी लक्षात घेऊन नाशिक-पुणे विमानसेवेचा विचार केला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. १९ प्रवाशांची क्षमता असलेले विमान नाशिक-मुंबई हवाई सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

नाशिक होणार ‘एअर कनेक्ट’नाशिक शहराचा केंद्राच्या उडान योजनेत समावेश झाल्यामुळे प्रमुख सहा शहरांसोबत नाशिक ‘एअर कनेक्ट’ होणार आहे. नाशिकच्या भविष्यकालीन विकासाच्या दृष्टीने हे अत्यंत चांगले संकेत मानले जात आहे. नाशिककरांना मुंबई व पुण्यापर्यंत विमानसेवा उपलब्ध झाल्यास या मोठ्या शहरांमधून देश-विदेशात सहज जाता येणार आहे. या विमानसेवेमुळे कमी वेळेत नाशिककरांना मुंबई व पुण्याला पोहचणे शक्य होणार आहे.१४२० रुपये प्रतिप्रवासीनाशिक-मुंबई विमानसेवेसाठी उडान योजनेंतर्गत एअर डेक्कन कंपनीकडून प्रतिप्रवासी १४२० रुपये दर आकारण्यात येणार आहे. केंद्राच्या योजनेमुळे नाशिक-मुंबईसाठी सर्वसामान्यांना परवडणारे विमानभाडे निश्चित करण्यात आले आहे. यासाठी गुरुवारपासून (दि.१३) आॅनलाइन नोंदणी सुरू होणार आहे.

टॅग्स :NashikनाशिकAirportविमानतळMumbaiमुंबईpune airportपुणे विमानतळ