शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

मुहर्रम प्रवचनमाला : ‘करबला’मधून सत्य अन् मानवतेचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 16:21 IST

सारडासर्कल येथे सालाबादप्रमाणे शेकडो वर्षांच्या परंपरेनुसार यावर्षीदेखील मानाचा ताबुत सय्यद कुटुंबीयांकडून उभारण्यात आला आहे.

ठळक मुद्दे‘इमामशाही’त मानाचा ताबूत‘यादे करबला’ या प्रवचनमालांचे ठिकठिकाणी आयोजन

नाशिक : सत्य आणि मानवतावादी तत्त्वांच्या संरक्षणार्थ इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांचे नातू शहीद-ए-आजम हजरत इमाम-ए-हुसेन यांनी स्वत:सह आपल्या कुटुंबीयांच्या प्राणांची आहुती दिली. मानवतावाद हा सर्वश्रेष्ठ असल्याचा संदेश त्यांनी ‘करबला’ येथील बलिदानातून दिला आहे, असा सूर जुने नाशिक, वडाळागाव परिसरात सुरू असलेल्या दहा दिवसीय मुहर्रमच्या प्रवचनमालांमधून उमटला. मुहर्रमच्या प्रवचनमालांची मंगळवारी (दि.१०) सांगता होणार असून, मुस्लीम बांधव ‘आशुरा’चा दिवस पाळून विशेष नमाजपठण करणार आहेत.हजरत इमाम-ए-हुसेन यांच्यासह करबलाच्या मैदानात हौतात्म्य पत्कारणाऱ्या शहिदांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी मुहर्रमचे सुरुवातीचे दहा दिवस ‘यादे करबला’ या प्रवचनमालांचे ठिकठिकाणी आयोजन केले जाते. यावर्षीदेखील मोठ्या संख्येने जुने नाशिक, वडाळागाव परिसरात प्रवचनमाला सुरू आहेत. या प्रवचनमालांमध्ये धर्मगुरूंकडून करबलाचे युद्ध, त्यामागील उद्देश, हेतू आणि शिकवणीविषयी प्रकाशझोत टाकला जात आहे. महिलांसाठी स्वतंत्ररीत्या प्रवचनमाला आयोजित करण्यात आल्या आहेत. यामध्ये महिला धर्मगुरूंकडून मार्गदर्शन केले जात आहे. वडाळागावातील तैबानगर मदरसा, मदिनानगरमधील मदरसा नुरूल ऐन, जय मल्हार कॉलनी उद्यान, वडाळारोडवरील इमाम अहमद रजा लर्निंग सेंटर, जुने नाशिकमधील अब्दुल गनी हॉल यांसह आदी ठिकाणी महिलांसाठी खास प्रवचनमाला मागील रविवारपासून (दि.१) सुरू आहेत. तसेच पुरुषांसाठी जुने नाशिकमधील कोकणीपुरा येथील रजा चौक, बागवानपुरा चौक, वडाळारोडवरील चिश्तिया कॉलनी, वडाळागावातील गौसिया मशिद कबरस्तान परिसरात प्रवचनमाला सुरू आहेत. यामध्ये मौलाना मुफ्ती हनीफ कानपुरी, मौलाना शाकीर रजा, मौलाना मुफ्ती जुबैर अख्तर यांचे प्रवचन सुरू आहे.घराघरांत फातिहा पठणआशुरादिनाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपासून मुस्लीम बांधवांकडून घराघरांमध्ये विशेष खाद्यपदार्थ तयार करून फातिहापठण करण्यात येत आहे. मंगळवारी मुहर्रमच्या आशुरानिमित्त सकाळ-सायंकाळी मुस्लीम बांधव खिचडी, सरबत तयार करून फातिहा पठण करणार आहेत. तसेच शहरातील विविध मशिदींमध्ये  ‘आशुरा’च्या खास नमाजचे पठण व प्रार्थना करण्यात येणार आहे.‘इमामशाही’त मानाचा ताबूतसारडासर्कल येथे सालाबादप्रमाणे शेकडो वर्षांच्या परंपरेनुसार यावर्षीदेखील मानाचा ताबुत सय्यद कुटुंबीयांकडून उभारण्यात आला आहे. या ताबुताचे वैशिष्ट म्हणजे पूर्णत: पर्यावरणपूरक. बांबूच्या कामट्या आणि कापूसचा वापर करून तयार करण्यात आलेल्या ताबुतावर अळीवच्या बिया कापसामध्ये पेरल्या जातात. दहा दिवस पाण्याची फवारणी केली जाते. हिरवळीने हा ताबूत बहरलेला पहावयास मिळतो.

टॅग्स :NashikनाशिकMuslimमुस्लीमmuharramमुहर्रम