शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

मुहम्मद रफी यांना सरकारने द्यावा ‘भारतरत्न’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 00:18 IST

हिंदी, उर्दू, मराठी, इंग्रजी, तेलगू, पंजाबी, गुजराथी, बंगाली अशा विविध भाषांमधून हजारो गीतांना स्वरबद्ध करणारे पद्मश्री मुहम्मद रफी या दिग्गज गायकाचा भारत सरकारने मरणोपरान्त ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च पुरस्कार देऊन सन्मान करावा, अशी इच्छा टकलेनगर परिसरात राहणाऱ्या त्यांच्या ६५ वर्षीय चंद्रकांत दुसाने या चाहत्याने केली आहे.

मुहम्मद रफी जयंती विशेषनाशिक : हिंदी, उर्दू, मराठी, इंग्रजी, तेलगू, पंजाबी, गुजराथी, बंगाली अशा विविध भाषांमधून हजारो गीतांना स्वरबद्ध करणारे पद्मश्री मुहम्मद रफी या दिग्गज गायकाचा भारत सरकारने मरणोपरान्त ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च पुरस्कार देऊन सन्मान करावा, अशी इच्छा टकलेनगर परिसरात राहणाऱ्या त्यांच्या ६५ वर्षीय चंद्रकांत दुसाने या चाहत्याने केली आहे.  हिंदी चित्रपटसृष्टीचे प्रख्यात पार्श्वगायक मुहम्मद रफी यांचा जन्म पंजाब राज्यातील कोटला जवळ सुलतनसिंह येथे २४ डिसेंबर १९२४ साली झाला. सोमवारी (दि.२४) त्यांची ९४वी जयंती साजरी होत आहे. यानिमित्त पूर्वसंध्येला शहरातील रफी यांचे अस्सल व कट्टर चाहते चंद्रकांत दुसाने यांनी ‘लोकमत’शी बोलताना रफी साहेबांच्या स्मृतींना उजाळा दिला.बालपणापासून रफींच्या गीतांची भुरळ पडलेल्या दुसाने यांनी आपले उभे आयुष्य त्यांच्या गीतांवर प्रेम करण्यात व्यतीत केले. त्यांनी रफींच्या आवाजातील सुमारे वीस हजार गीतांचा संग्रह करून रेकॉर्डप्लेअर, कॅसेट, सीडीच्या माध्यमातून करून ठेवला आहे. हा संग्रहच मला उतारवयात तारुण्याची ऊर्जा बहाल करत असल्याचे दुसाने यांनी आवर्जून सांगितले. सरकारकडून रफींना भारतरत्न जाहीर करण्यात आल्याची वार्ता जेव्हा माझ्या कानी पडेल तेव्हा माझ्या प्रेमाचे खरे सार्थक होईल, असे दुसाने म्हणाले.आई देत होती रफींची ‘कसम’दुसाने यांनी एखादी गोष्ट करावी किंवा करू नये यासाठी त्यांना त्यांच्या मातोश्री बालपणापासून महाविद्यालयीन जीवनापर्यंत थेट रफीजींची ‘कसम’ देत असे, अशी आठवणही त्यांनी सांगितली. जुन्या काळात तांग्यातून नव्या चित्रपटाची उद्घोषणा केली जात होती. त्यावेळी ज्या चित्रपटांमध्ये रफींची गीते आहेत ती उद्घोषणेदरम्यान कानी पडली की दुसाने त्या तांग्यामागे फिरत असे.वास्तुशांतीला रफींच्या गीतांची मेजवानीदुसाने यांनी जेव्हा नवीन घर घेतले तेव्हा त्यांनी कुठल्याही प्रकारची पूजाविधी करण्याअगोदर वास्तुशांती चक्क रफींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून केली. तसेच संपूर्ण दिवसभर मित्र परिवारासह रफीजींवर प्रेम करणाºयांना बोलावून त्यांची गाणी ऐकविली होती. दुसाने यांनी ३५ वर्षे कंपनीत कामगार म्हणून नोकरी करतानाही रफींच्या गीतांचा छंद तितकाच निष्ठेने जोपासला. ‘ओन्ली रफीं’चे त्यांच्याकडे एक हजार रेकॉर्ड, आठशे कॅसेट, ३५० सीडींचा संग्रह आहे.

टॅग्स :Mohammed Rafiमोहम्मद रफीNashikनाशिकGovernmentसरकार