शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रकांत पाटलांनी बारामतीमध्ये शरद पवार यांच्याबाबतीत बोलायला नको होते; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
Smriti Irani : "हिंमत असेल तर भाऊ-बहिणीने..."; स्मृती इराणींचं राहुल-प्रियंका गांधींना खुलं आव्हान
3
'लोकसभेवेळी सर्वांचं आय लव्ह यू असतं. मात्र विधानसभेवेळी...', गुलाबराव पाटील यांचं सूचक विधान, रोख कुणाकडे, चर्चांना उधाण
4
"शरद पवारांना पाहिजे तोच निर्णय ते घेतात, फक्त दाखवताना तो सामुहिक दाखवतात"
5
मराठी-गुजराती वादाची 'राजकीय फोडणी'; घाटकोपरच्या 'त्या' सोसायटीतील रहिवाशी म्हणतात...
6
राजकारण तापले उद्धव सेनेच्या जिल्हाप्रमुख बडगुजर यांना हद्दपारची नोटीस
7
‘१५ सेकंदांसाठी पोलीस हटवा, कळणारही नाही की…’ नवनीत राणांचं ओवेसी बंधूंना आव्हान, एमआयएम संतप्त
8
'महाराष्ट्रात कंपनी उघडी ठेवायची असेल तर..; गुजराती कंपन्यांना उद्धव ठाकरेंचा इशारा
9
भाजपा नेत्या चित्रा वाघ यांचं खुलं पत्र; अभिनेत्री रेणुका शहाणेंना सुनावले खडे बोल
10
Opening Bell : सेन्सेक्स-निफ्टीमध्ये घसरणीचं सत्र सुरूच; Hero Motocorp मध्ये तेजी, डॉ. रेड्डीज घसरला
11
सोनालीच्या जगण्याची होती ३० टक्के शक्यता; मृत्युच्या दारातून परतलेल्या अभिनेत्रीने सांगितला कॅन्सरचा प्रवास
12
गुणरत्न सदावर्ते दाम्पत्याला सहकार खात्याचा दणका; एसटी बँकेवरील संचालकपद रद्द
13
Paytm Share Price : आपटून 'ऑल टाईम लो'वर Paytm चा शेअर; IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांवर डोक्याला हात लावायची वेळ
14
मध्यंतर...पिक्चर अभी बाकी है दौस्त! घड्याळाचे काटे पवारांकडून ठाकरे-शिंदेंकडे वळले, शहरी मतदारांवर भिस्त
15
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
16
संपादकीय: ऋण काढून सण! बचत घसरली, आता कोण वाचविणार...
17
भाजपाची चौथ्या-पाचव्या टप्प्यासाठी मोठी तयारी! जे.पी. नड्डा आज निवडणुकीचा आढावा घेणार
18
आजचे राशीभविष्य - ०९ मे २०२४ : आर्थिक फायदा संभवतो,विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील
19
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
20
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत

वीजचोरांना महावितरणाचा शॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2021 6:32 PM

पिंपळगाव बसवंत : वीज पुरवठ्याच्या तुलनेत वीज बिलाच्या रकमेत कमालीची घट झाल्याने पिंपळगावच्या महावितरण विभागाने कारवाईचा बडगा सुरू करत आतापर्यंत ६८ ग्राहकांवर गुन्हे दाखल करत १८ लाख ११ हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. आतापर्यंत १४ लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देपिंपळगावी ६८ ग्राहकांवर कारवाई : १८ लाख ११ हजारांचा दंड

पिंपळगाव बसवंत : वीज पुरवठ्याच्या तुलनेत वीज बिलाच्या रकमेत कमालीची घट झाल्याने पिंपळगावच्या महावितरण विभागाने कारवाईचा बडगा सुरू करत आतापर्यंत ६८ ग्राहकांवर गुन्हे दाखल करत १८ लाख ११ हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. आतापर्यंत १४ लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे.पिंपळगाव विभागामार्फत ३८ गावांमध्ये २८ हजार शेती व घरगुती वीज ग्राहक आहेत, पण दोन कोटी ४० लाख रुपये मासिक बिलाच्या उद्दिष्टापेक्षा विजेचा वापर अधिक होत होता. त्यामुळे चोरीतून वीज गळती होत असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार पिंपळगाव बसवंत , पालखेड, दावचवाडी, साकोरे, वरखेडा, खेडगाव, पाचोरेवणी, चिंचखेड, कोकणगाव, जवळके वणी, उंबरखेड आदी ११ गावातील वीजचोरांवर लाखो रुपयांचा दंड ठोकत वीजचोरीचा शॉकच दिला. सहाय्यक अभियंता नितीन पगारे, मंगेश नागरे, चंद्रशेखर निकम, रामप्रसाद थोरात, योगेश नाठे, विकास गायकवाड आदी कर्मचाऱ्यांच्या पथकाने ही कारवाई केली.वीजचोरांचे धाबे दणाणलेपालखेड, ओझरखेड कालव्याला आवर्तन सुरू असल्याने शेतीला पाणी भरण्यासाठी वीज कंपनीला आकडे टाकून वीजपुरवठा घेतला गेला. उपकार्यकारी अभियंता एकनाथ कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने छापा सत्र सुरू केला असता यात आकडे टाकून अनधिकृत वीजपुरवठा घेणाऱ्या पथकांच्या निदर्शनास आले तर मीटरमध्ये छेडछाड असे प्रकार उघडकीस आले. या कारवाईमुळे वीजचोरांचे धाबे दणाणले असून ६८ जणांवर झालेल्या कारवाईत १८ लाख ११ हजाराचा दंड ठोठावण्यात आला असून आतापर्यंत ५१ जणांकडून १४ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. आकडे टाकण्यासाठी वापरलेली वायर, छेडछाड केलेले मीटर जप्त करण्यात आले आहे. 

टॅग्स :electricityवीजCrime Newsगुन्हेगारी