शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या महानंदचे अखेर गुजरातच्या एनडीडीबीकडे हस्तांतरण; मदर डेअरीने घेतला ताबा
2
"१५ तास घ्या, तुम्हाला कोण घाबरतंय, आम्ही इथंच बसलो आहोत", असदुद्दीन ओवेसींचे नवनीत राणा यांना आव्हान
3
"अजितदादांचे माहिती नाही, मी ठाकरेंना चांगलं ओळखतो"; फडणवीसांचा खोचक टोला
4
'संपूर्ण बकवास...', सॅम पित्रोदा यांच्या चिनी-आफ्रिकन वक्तव्यावर रॉबर्ट वाड्रा संतापले
5
"मेरा बाप महागद्दार है..."; प्रियंका चतुर्वेदींच्या टीकेला शिवसेनेचं जशास तसं प्रत्युत्तर
6
४ जूननंतर एकनाथ शिंदे तुरुंगात जातील किंवा तडीपार होतील; संजय राऊतांचा इशारा
7
Smriti Irani : "हिंमत असेल तर भाऊ-बहिणीने..."; स्मृती इराणींचं राहुल-प्रियंका गांधींना खुलं आव्हान
8
मराठी चित्रपटाचा सातासमुद्रापार डंका, अमेरिकेत 'स्वरगंधर्व सुुधीर फडके'चे शो हाऊसफुल्ल!
9
भाईजानच्या सिनेमात श्रीवल्लीची एन्ट्री! सलमानच्या 'सिकंदर'ची हिरोईन बनणार रश्मिका मंदाना
10
अक्षय्य तृतीया: अन्नपूर्णा स्वरुपातील स्वामींचे करा स्मरण, मिळेल अक्षय्य पुण्यफल; कसे? पाहा
11
मोदींची प्रकृती बरी नाही, भाजपाने त्यांना प्रचारातून बाजूला करावं; संजय राऊतांचा टोला
12
Video - ज्या व्यक्तीला बेघर समजून चिमुकल्याने दिले सर्व पैसे तो निघाला अब्जाधीश अन् मग...
13
Gold Price Today: सोन्याच्या तेजीला ब्रेक! आज स्वस्त झालं Gold, पाहा नवे दर
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठे खर्च करतात आपला पगार?; मुख्यमंत्री मोहन यादव यांनी दिली माहिती
15
AI लक्ष्मीकांत बेर्डेंचा अनुभव देऊ शकत नाही, लेक अभिनय बेर्डेने स्पष्टच सांगितलं
16
३ दहशतवादी ठार, ४० तास चालली चकमक; लष्कराची मोठी कारवाई
17
दीपिकाबरोबर घटस्फोटाच्या चर्चांना रणवीरने दिला पूर्णविराम! लग्नाचे फोटो डिलीट केल्यावर म्हणतो- "माझ्या पत्नीने..."
18
चंद्रकांत पाटलांनी बारामतीमध्ये शरद पवार यांच्याबाबतीत बोलायला नको होते; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
19
"शरद पवारांना पाहिजे तोच निर्णय ते घेतात, फक्त दाखवताना तो सामुहिक दाखवतात"
20
मराठी-गुजराती वादाची 'राजकीय फोडणी'; घाटकोपरच्या 'त्या' सोसायटीतील रहिवाशी म्हणतात...

महावितरणची बिले थकली; ओझरकरांची वीज कापली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2022 11:09 PM

ओझर : ओझर नगरपरिषदेने विद्युत बिले थकविल्यामुळे महावितरण कंपनीने ओझर गावासह उपनगरातील पथदीप व पाणीपुरवठ्याच्या कनेक्शनचा विद्युत पुरवठा रविवार (दि.२९) पासून खंडित केल्यामुळे संपूर्ण गाव अंधारात बुडाले आहे. विद्युत पुरवठा खंडित केल्याने ओझरसह उपनगरातील नागरिकांना पाण्यापासूनही वंचित राहण्याची वेळ येणार आहे.

ठळक मुद्देनगरपरिषदेला दणका : गाव बुडाले अंधारात, पाणीपुरवठ्यावरही होणार परिणाम

ओझर : ओझर नगरपरिषदेने विद्युत बिले थकविल्यामुळे महावितरण कंपनीने ओझर गावासह उपनगरातील पथदीप व पाणीपुरवठ्याच्या कनेक्शनचा विद्युत पुरवठा रविवार (दि.२९) पासून खंडित केल्यामुळे संपूर्ण गाव अंधारात बुडाले आहे. विद्युत पुरवठा खंडित केल्याने ओझरसह उपनगरातील नागरिकांना पाण्यापासूनही वंचित राहण्याची वेळ येणार आहे.

ओझर नगरपरिषद हद्दीतील पथदीपासह पाणीपुरवठा विद्युत कनेक्शनची एकूण थकबाकी ६ कोटी २९ लाख ५४ हजार ६६० इतकी असून थकबाकी भरणा करणेबाबत महावितरण कार्यालयाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून वारंवार पाठपुरावा करण्यात आला. तसेच १५ दिवसांची अल्टिमेटम नोटीसहीदेखील देण्यात आली होती. परंतु नगरपरिषदेने थकबाकीचा भरणा केला नाही. परंतु मे महिन्याच्या बिलापोटी नगरपरिषदेने ७ लाख ६ हजार ६०२ रुपयांचा वीजबिलाचा भरणा करण्यासाठी महावितरणला धनादेश दिला.

थकबाकी रकमेच्या तुलनेत भरणा केलेली रक्कम अत्यल्प अशी एकच महिन्याची असल्याने उर्वरित थकबाकी रक्कम वसूल व्हावी म्हणून महावितरण कंपनीने सदर धनादेश मुख्याधिकारी ओझर नगरपरिषद यांना परत पाठवित. आपण थकबाकीच्या रकमेपोटी दरमहिन्याला किती रक्कम देणार याचा आराखडा द्यावा, असे एका पत्राद्वारे कळविले असता त्याला उत्तर म्हणून नगरपरिषदेने पुढील महिन्यापासून बिलाबरोबर थकबाकीपोटी १ लाखाची रक्कम भरेल असे महावितरणला पत्राद्वारे कळविले. उपविभाग अधिकाऱ्यांनी ते पत्र पुढील कार्यवाहीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविले आहे.अल्टिमेटम संपल्यावर कारवाईमहावितरणला दिलेल्या ११ ते २६ मे अशा पंधरा दिवसांच्या अल्टिमेटमनुसार नगरपरिषदेने थकबाकीचा भरणा केला नाही म्हणून महावितरणने रविवारी सायंकाळी ओझर नगरपरिषद हद्दीतील पथदीपांसह पाणीपुरवठा कनेक्शनचा विद्युत पुरवठा खंडित केला. त्यामुळे सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरले आहे, तसेच त्याचा पाणीपुरवठ्यावरही परिणाम होणार असल्याने नागरिकांना पाण्यापासून वंचित राहावे लागणार आहे.महावितरणने ओझर नगरपरिषदेला थकबाकी रक्कम भरणा करण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली होती. त्या मुदतीत नगर परिषदेने भरणा न केल्याने नाइलाजास्तव पथदीपांचे व पाणीपुरवठ्याचा विद्युत पुरवठा खंडित करावा लागला आहे. ओझर नगरपरिषदेने थकबाकीचा भरणा करून महावितरण कंपनीस सहकार्य करावे.- योगेश्वर पाटील, उपकार्यकारी अभियंता, ओझर उपविभाग

टॅग्स :electricityवीजtalukaतालुका