शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदा वृक्षतोड केल्याप्रकरणी खासदार पुत्राला सव्वाचार लाखांचा दंड ट्रक जप्त: पोलिसांकडून मात्र गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2022 00:51 IST

नाशिक- शहरात पर्यावरण संवर्धनासाठी आणि वृक्षतोड थांबवण्यासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे स्वत: प्रयत्न करत असताना दुसरीकडे मात्र त्यांच्या पक्षाच्या खासदार पुत्राने महापालिकेची परवानगी न घेताच एका भूखंडावरील सात वृक्ष तोडल्याचे पुढे आले आहे. शुक्रवारी (दि.१०) हा प्रकार लक्षात आल्यानंतर महापालिकेने अंजिक्य हेमंत गोडसे आणि त्यांचे भागीदार योगेश ताजनपुरे यांना महापालिकेने ४ लाख २० हजार रुपयांचा दंड भरण्याची नोटीस बजावली आहे.

नाशिक- शहरात पर्यावरण संवर्धनासाठी आणि वृक्षतोड थांबवण्यासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे स्वत: प्रयत्न करत असताना दुसरीकडे मात्र त्यांच्या पक्षाच्या खासदार पुत्राने महापालिकेची परवानगी न घेताच एका भूखंडावरील सात वृक्ष तोडल्याचे पुढे आले आहे. शुक्रवारी (दि.१०) हा प्रकार लक्षात आल्यानंतर महापालिकेने अंजिक्य हेमंत गोडसे आणि त्यांचे भागीदार योगेश ताजनपुरे यांना महापालिकेने ४ लाख २० हजार रुपयांचा दंड भरण्याची नोटीस बजावली आहे. तसेच पोलीस ठाण्यात तक्रार करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. मात्र, पोलीस तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ करीत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. यासंदर्भात अंजिक्य गोडसे यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला मात्र, ते उपलब्ध होऊ शकले नाही. मात्र, ते संबंधित फर्ममध्ये स्लीपिंग पार्टनर असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले.नाशिकरोड विभागातील प्रभाग क्रमांक १९ मध्ये देवळाली शिवारातील सर्व्हे नंबर १९३-२० येथे खर्जुल मळ्यातील संबंधित भूखंडावर विविध प्रजातीचे वृक्ष होते. याठिकाणी इमारत बांधण्यासाठी अजिंक्य गोडसे व ताजनपुरे यांनी महापालिकेची परवानगी न घेताच सात वृक्ष तोडले. यासंदर्भात महापालिकेकडे तक्रार आल्यानंतर तपासणी केली तेव्हा तक्रारीत तथ्य आढळले. रेनट्री, काशिदचे प्रत्येकी एक आणि काटेरी बाभुळीचे पाच असे एकूण सात वृक्ष तोडण्यात आले. त्याचा घेर आणि अन्य शास्त्रोक्त पध्दतीनुसार किंमत काढून महापालिकेचे विभागीय अधिकारी सुनील आव्हाड यांनी ४ लाख २० हजार रुपयांच्या दंडाची नोटीस बाजवली आहे. सात दिवसातही रक्कम महापाालिकेच्या कोषागारात वृक्ष निधीमध्ये जमा करावी, असे नमूद करण्यात आले आहे. अन्यथा महाराष्ट्र नागरी क्षेत्र झाडाचे जतन अधिनियम१९७५ नुसार फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा नोटिसीत देण्यात आला आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक