शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

खासदार म्हणतात, थांबा आणि पहा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 15:50 IST

कांदा निर्यात बंदी : शेतकऱ्यांना सबुरीचा सल्ला

ठळक मुद्देएक दिवस वाढलेले भाव पुन्हा जैसे थे झाल्याने कांदा उत्पादक शेतकरी आणखी पेचात

सायखेडा : कांदा निर्यातबंदी उठविण्यासंदर्भात केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी ट्विट केले परंतु, त्यासंदर्भात अधिसूचना प्रसिद्ध न झाल्याने शेतकरी वर्ग संभ्रमित असताना दिंडोरीच्या खासदार डॉ. भारती पवार यांनी कांदा निर्यात बंदी उठविण्यासंबंधी प्रशासकीय पूर्तता सुरु असून निर्णय झालेला आहे. त्यामुळे संभ्रमित न होता थांबा आणि पहा, असा सबुरीचा सल्ला शेतकऱ्यांना दिला आहे.केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्यातील कांद्याची निर्यात खुली केल्याची वार्ता सोशल मीडियावर व्हायरल झाली. या संदर्भात केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी केलेल्या ट्विटचा हवाला दिला गेला. मात्र, तीन दिवस उलटूनही त्यासंदर्भात अधिसूचना न निघाल्याने शेतकरी, व्यापारीवर्ग संभ्रमात पडला आहे. पासवान यांनी ट्विट केले त्याच्या दुस-याच दिवशी कांद्याचे बाजार भाव चारशे रूपयांनी वाढले परंतु या संदर्भात कोणताही शासन निर्णय बाजार समितीला अद्याप प्राप्त झाला नाही अथवा तसा निर्णय शासनाच्या संकेत स्थळावर उपलब्ध झाला नाही, त्यामुळे एक दिवस वाढलेले भाव पुन्हा जैसे थे झाल्याने कांदा उत्पादक शेतकरी आणखी पेचात सापडले. या सा-या पार्श्वभूमीवर दिंडोरी लोकसभेच्या खासदार भारती पवार यांनी केंद्रिय मंत्री यांच्याशी कांदा निर्यातबंदी उठविण्यासंबंधी सकारात्मक चर्चा झाली असून निर्यात संदर्भात प्रशासकीय कागद पत्रांची पूर्तता सुरु आहे. बंदी उठविण्याचा निर्णय झाला आहे आणि कांदा निर्यात खुली केली आहे. निर्यात बंदी उठविण्याची घोषणा झाली म्हणजे लगेच सारे काही सुरळीत होत नाही. त्याच्या प्रशासकीय प्रक्रियेसाठी काही अवधी दद्यावा लागतो. त्यामुळे शेतक-यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पवार यांनी केले.

टॅग्स :Nashikनाशिकonionकांदा