नाशिक : महापालिकेमार्फत झालेल्या सर्वेक्षणात आढळून आलेल्या १०५७ शाळाबाह्य मुलांपैकी ३७९ मुलांना आतापर्यंत महापालिका शाळांमध्ये प्रवेश देण्यात आले असून, त्यातील २२१ मुले ही शहरातील मदरशांमधील असल्याने मनपाचे शिक्षक थेट मदरशांमधून जाऊन सप्ताहातून एकदा किंवा दोनदा सदर मुलांना शिकविणार आहेत. दरम्यान, सर्वेक्षणात आढळून आलेल्या ५१ विकलांग मुलांनाही त्यांच्या घरी जाऊन आनंददायी शिक्षण देण्याचा प्रयत्न राहणार असल्याची माहिती उपआयुक्त दत्तात्रेय गोतीसे व शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी उमेश डोंगरे यांनी दिली.
मदरशांमध्ये शिकविणार मनपाचे शिक्षक
By admin | Updated: August 5, 2015 00:21 IST