शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

रामाच्या जीवनाचे संदर्भ देत खासदार संजय राऊत यांनी भरला अधिवेशनात जोश

By दिनेश पाठक | Updated: January 23, 2024 13:24 IST

अयोध्या आंदोलनवेळी शिवसेना नसती तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राममंदिरात प्राणप्रतिष्ठा करता आली नसती हे देखील राऊत यांनी आवर्जून सांगितले. 

नाशिक :  खासदार संजय राऊत यांनी यांनी नाशिक येथे भरलेल्या शिवसेनेच्या अधिवेशनात आपल्या भाषणामध्ये श्रीराम याचे जीवनचरित्र वर्णन करून कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला. देशाचे वातावरण राममय असताना महाशिबिराची ज्योत प्रज्वलित झाली आहे. ही अतिशय आनंदाची बाब आहे. रामाशी शिवसेनेचे भावनिक नाते आहे. सर्वात जवळचे नाते शिवसेनेचे आहे. अयोध्या आंदोलनवेळी शिवसेना नसती तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राममंदिरात प्राणप्रतिष्ठा करता आली नसती हे देखील राऊत यांनी आवर्जून सांगितले. 

आजच्या अधिवेशनाचे ठिकाण धर्मक्षेत्र, कुरुक्षेत्र आहे. रामाने देखील अशाच जागांवर लढाया लढल्या हीच अवस्था आज शिवसेनेची असून राजकीय लढाई आम्हीच जिंकणार आहोत. रामाला  सर्वात जास्त संघर्ष नाशिकमध्ये अनुभवास आला परंतु रामाचे धैर्य, शौर्य व संयम हे तीन गुण होते म्हणून राम संघर्षावर मात करून विजयी मार्गावर गेला तेच धैर्य, शौर्य, संयम हे उद्धव ठाकरे व शिवसेनेत आहे. त्यामुळे आम्ही देखील विजयी पताका फडकवणारच असे सांगून राऊत यांनी समोर बसलेली आमची वानरसेना असल्याचा उल्लेख करत उपस्थित राज्यातील पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह भरला. 

सैनिक नेता म्हणून उद्धव ठाकरे यांची ओळख आहे. रामाची लढाई नितीमत्तेसाठी होती हीच लढाई सध्या उद्धव ठाकरे लढत आहे. संघर्षातून कोणताही माणूस पुढे जातो हे देखील सांगून  राम अयोध्येत होता तेव्हा तो युवराज म्हणून वावरला परंतु जेव्हा तो वनवासात गेला तेव्हा तो राम झाला हे सांगताना राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना साहेब थांबा आपलेही दिवस पुन्हा येतील असा विश्वास दिला. रामाच्या काळामध्ये एकच रावण होता परंतु आता दिल्ली, मुंबईमध्ये सगळीकडे रावण निर्माण झाले आहेत, परंतु रावणाला देखील रामाकडून पराजित व्हावे लागले होते दिल्लीतील रावणाचा देखील एक दिवस पराभव होईल, असे सांगून राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष केले. 

कोण आले नरेंद्र मोदी, कोण आले अजित पवार. राम म्हणतात जे ईश्वराने निर्माण केले ते माझे भाग्य आहे त्यामुळे अजीत पवार, फडणवीस, शिंदे अरे थोडे थांबा काळ येईल आमचा. आम्ही तुम्हाला गाडूच. उद्धव साहेब घाबरू नका आम्ही तुमच्यासोबत आहेत या सगळ्या रावणाचा पराभव आपण करूच. राम म्हणतात जे ईश्वराने निर्माण केले ते माझे भाग्य आहे. त्यामुळे घाबरू नका आपण जिंकूच असेही खासदार राऊत यांनी सांगितले.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊत