लोहोणेर : लोहोणेर - देवळा रस्त्यावर अंबिका हॉटेल समोर गुरुवारी (दि.२४) दुपारी तीन वाजेच्या दरम्यान परराज्यातील ट्रकच्या केबिनमध्ये अचानक आग लागल्याने केबिन मधील साहित्य जळून खाक झाले.परिसरातील शेतकऱ्यांनी समय सुचकता दाखवत तातडीने पाणी मारून आग विझविल्याने कोणतीही जीवित हानी झाली नाही. याबाबत माहिती अशी की, परराज्यात माल वाहतुक करणारा ( क्रमांक टी. टी. ७७ के. ८००९) हा ट्रक लोहोणेर - देवळा या राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना अंबिका हॉटेल समोर या गाडीमधून मोठ्या प्रमाणावर धुराचे लोट बाहेर पडू लागले.यामुळे सदर ट्रकचे चालक व क्लिनर यांच्यात घबराट निर्माण झाली. त्यांनी चालत्या गाडीतून बाहेर उड्या मारत आपला जीव वाचविण्याचा प्रयत्न केला.रस्त्या लगत शेतकऱ्यांनी तातडीने पाण्याच्या बादल्या घेवुन धावपळ केल्याने तातडीने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. या घटनेत सदर ट्रकच्या चालकाचा हाताला जळाल्याने जखम झाली.
महामार्गावरील चालत्या ट्रकला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 17:26 IST
लोहोणेर : लोहोणेर - देवळा रस्त्यावर अंबिका हॉटेल समोर गुरुवारी (दि.२४) दुपारी तीन वाजेच्या दरम्यान परराज्यातील ट्रकच्या केबिनमध्ये अचानक आग लागल्याने केबिन मधील साहित्य जळून खाक झाले.
महामार्गावरील चालत्या ट्रकला आग
ठळक मुद्देट्रकच्या चालकाचा हाताला जळाल्याने जखम झाली.