शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

चालत्या ‘शिवशाही’ बसने घेतला पेट; सुदैवाने प्रवाशी बचावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 22:33 IST

नाशिक-इंदूर या मार्गावरील धुळे आगाराची शिवशाही बस (एम.एच.१८, बी.जी. २१३५) शहरातील नवीन मध्यवर्ती बसस्थानकातून रविवारी (दि.११) आठ वाजता इंदूरच्या प्रवासाला निघाली. यावेळी पाच महिलांसह एकूण १२ प्रवासी बसमध्ये होते.

ठळक मुद्दे प्रवासी उतरत नाही तोच बसचा पुढील भाग आगीच्या भक्ष्यस्थानीजवानांनी त्वरित पाण्याचा मारा करण्यास सुरुवात केली तासाभरानंतर आग संपूर्णपणे विझली

नाशिक : आडगाव जकात नाक्याजवळ चालत्या शिवशाही बसने अचानक पेट घेतला. अवघ्या पाच मिनिटांत बस आगीमध्ये भस्मसात झाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचा बंबासह जवान घटनास्थळी दाखल झाले. तत्काळ पाण्याचा मारा करण्यात आला. आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या बसला विझविण्यास जवानांना सुमारे पाऊण तासानंतर यश आले. सुदैवाने या घटनेतील सर्व प्रवासी सुखरूप असून, त्यांचे प्रवासाचे साहित्य मात्र जळून खाक झाले आहे.याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, नाशिक-इंदूर या मार्गावरील धुळे आगाराची शिवशाही बस (एम.एच.१८, बी.जी. २१३५) शहरातील नवीन मध्यवर्ती बसस्थानकातून रविवारी (दि.११) आठ वाजता इंदूरच्या प्रवासाला निघाली. यावेळी पाच महिलांसह एकूण १२ प्रवासी बसमध्ये होते. सुमारे वीस मिनिटांचे अंतर बसने कापले. बस आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहावा मैलाच्या काही मीटर अंतरावर पोहचली असता अचानकपणे चालकाच्या कॅबिनमधील इन्व्हर्टरच्या वायरिंगमधून धूर येत असल्याचे चालक गोरख चवंदगिर यांच्यासह काही पुढे बसलेल्या प्रवाशांच्या लक्षात आले. चवंदगिर यांनी तत्काळ बस सुरक्षित मुंबई-आग्रा महामार्गावरून बाजूला उभी करत प्रवाशांना उतरण्यास सांगितले. बसला एकच दरवाजा असल्यामुळे प्रवाशांना एकापाठोपाठ उतरावे लागले. प्रवासी उतरत नाही तोच बसचा पुढील भाग आगीच्या ज्वालांच्या भक्ष्यस्थानी पडला. तत्काळ प्रवाशांसह चवंदगिर व वाहक सागर आढाव यांनी आपत्कालीन क्रमांक (१०१)वर संपर्क साधला. अग्निशामक विभागीय कार्यालय कोणार्कनगर येथून जवान बंबासह अवघ्या पाच मिनिटांत घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत बस पूर्णपणे आगीच्या विळख्यात सापडली होती. जवानांनी त्वरित पाण्याचा मारा करण्यास सुरुवात केली. सुमारे पाउणतास पाण्याचा मारा करून आग विझविण्याचा जवान प्रयत्न करत होते. तासाभरानंतर आग संपूर्णपणे विझली. यावेळी केवळ शिवशाही बसचा सांगाडा शिल्लक राहिला होता. 

टॅग्स :NashikनाशिकShivshahiशिवशाहीBus Driverबसचालक