शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

गिरणारे-वाडगाव रस्त्याच्या कामासाठी ग्रामस्थांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 00:29 IST

गिरणारे ते वाडगावरोड, वाडगाव ते आळंदी डॅम, वाडगाव ते करवंडेवाडी, वाडगाव ते दाबडगाव, या रस्त्याच्या दुरुस्तीकडे शासनाचे लक्ष्य वेधण्यासाठी मंगळवारी सकाळी वाडगावकरांनी रस्त्यावर धाव घेऊन सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून आंदोलन छेडले. रस्त्याचे काम न झाल्याने आगामी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आला.

गंगापूर/ मातोरी : गिरणारे ते वाडगावरोड, वाडगाव ते आळंदी डॅम, वाडगाव ते करवंडेवाडी, वाडगाव ते दाबडगाव, या रस्त्याच्या दुरुस्तीकडे शासनाचे लक्ष्य वेधण्यासाठी मंगळवारी सकाळी वाडगावकरांनी रस्त्यावर धाव घेऊन सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून आंदोलन छेडले. रस्त्याचे काम न झाल्याने आगामी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आला. दरम्यान, दिवाळीनंतर कामाची सुरुवात करण्याचे आश्वासन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले.गिरणारे वाडगाव रस्त्याची दुरवस्था झाल्याने नागरिकांना या रस्त्यावरून प्रवास करताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. रात्री-अपरात्री या रस्त्यावर लहान-मोठे अपघात घडत असून, नागरिक या रस्त्याला अक्षरश: वैतागले आहे. या संदर्भात वाडगावकरांनी गिरणारे ते वाडगाव रस्त्यासंदर्भात अनेक निवेदने दिली, परंतु काम होत नसल्याचे पाहून मंगळवारी सकाळी संपूर्ण गाव व परिसरातील वाड्या वस्त्यातील, नागरिकांनी वाडगाव चौफुलीवर एकत्र येत शासन व लोकप्रतिनिधींविरुद्ध घोषणाबाजी केली. तसेच आगामी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याबरोबरच ग्रामपंचायतीचा कर, महसूल कर भरण्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. सुमारे तासभर आंदोलन केल्यानंतर शिष्टमंडळाने थेट जिल्हा परिषद गाठून मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते यांना निवेदन सादर केले. गिरणारे गटातील व गोवर्धन गटातील जि. प. सदस्य अर्पणा खोसकर व हिरामण खोसकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासमवेत चर्चा करण्यात येऊन दोन्ही गटातील निधीतून १ कोटी १५ लाख रुपयांची तरतूद वाडगाव ते गिरणारे रस्त्याच्या दुरुस्तीसाठी करण्याचे ठरविण्यात आले. दिवाळीनंतर या रस्त्याचे काम सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र जोपर्यंत रस्ता संपूर्ण सुस्थितीत होत नाही तोपर्यंत बहिष्कार अस्त्र सुरूच राहणार असल्याचे वाडगावच्या सरपंच नंदा चहाळे, ग्रामपंचायत सदस्य दत्तू लहामगे, गणपत कडाळे, उत्तम कसबे, सुभाष कसबे, काकासाहेब कसबे, एकनाथ कसबे, बाळासाहेब कसबे, विलास कसबे, वाळू कसबे, भाऊसाहेब कसबे यांनी सांगितले.रस्त्याचे काम ५०० व ७०० मीटर होत असते, त्यामुळे एका बाजूने रस्ता झाला की दुसºया बाजूने तो खराब होतो. त्यामुळे गिरणारे ते वाडगाव हा साडेपाच मीटर रुं दीचा अखंड रस्ता पाहिजे आहे. आतापर्यंत आम्ही खूप सहन केले आता सहन करणार नाही.- काकासाहेब कसबे, ग्रामस्थरस्त्याच्या कामाचे टेंडर झालेले आहे ठेकेदाराला कार्यारंभ आदेशही देण्यातआला आहे त्याने जर २४ तासाच्या आत काम सुरू केले नाही तर त्याला काळ्या यादीत टाकण्यात येईल.- राजेश पांडे, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभागवाडगाव हे गाव आजूबाजूच्या तीन-चार गावांशी जोडलेले आहे. मात्र रस्त्याअभावी सर्वांनाच अडचणी येत आहेत. त्यामुळे गावाने ठराव केला आहे की, जोपर्यंत गिरणारे-वाडगाव रस्ता डांबरीकरण होत नाही तोपर्यंत आगामी निवडणुकीवर सामूहिक बहिष्कार टाकणार.- सुभाष कसबे, ग्रामस्थ, वाडगाव

टॅग्स :Nashikनाशिक