शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शहरातून संचलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 00:51 IST

विजयादशमीनिमित्त शहरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नाशिक शहरामधील भोसला, पंचवटी, म्हसरूळ, इंदिरानगर, सिडको व नाशिकरोड देवळाली गटांच्या माध्यमातून शहरातील विविध भागांतून गुरुवारी (दि. १८)भगव्या ध्वजासोबतच सघोष व सदंड संचलन करण्यात आले.

ठळक मुद्देशिस्तबद्धतेचे दर्शन : स्वयंसेवकांचा सहभाग

नाशिक : विजयादशमीनिमित्त शहरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यानाशिक शहरामधील भोसला, पंचवटी, म्हसरूळ, इंदिरानगर, सिडको व नाशिकरोड देवळाली गटांच्या माध्यमातून शहरातील विविध भागांतून गुरुवारी (दि. १८)भगव्या ध्वजासोबतच सघोष व सदंड संचलन करण्यात आले. संपूर्ण शहरात १३४ घोष व ७५१ स्वयंसेवकांनी संचलनात सहभाग घेतला. व्ही. एन. नाईक महाविद्यालयाजवळून सायंकाळी निघालेल्या शिस्तबद्ध संचलनाने नाशिककरांचे लक्ष वेधून घेतले.म्हसरूळ गटातून काढण्यात आलेल्या संचलनात सुमारे १६० स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. यावेळी नाशिक शहर जिल्हा सहसंघचालक प्रदीप केतकर यांच्यासह सेवाप्रमुख अनिरुद्ध कंठे, मनोज पटेल, संतोष भोर आदी उपस्थित होते. दिंडोरी नाका परिसरातून सुरुवात झालेल्या संचलनचा समृद्धी कॉलनी, काकासाहेब देवधर विद्यालयामार्गे पुन्हा दिंडोरी नाका परिसरात येऊन समारोप झाला. तर पंचवटीत गटातील संचलनाला साक्षी गणपतीपासून सुरुवात झाली. हे संचलन बुधवार पेठ, दंडे हनुमान चौक, शिरीशकुमार चौक, छपरी तालीम, मधली होळीमार्गे साक्षी गणपतीजवळ पोहचल्यानंतर समारोप करण्यात आला. या संचलनासाठी प्रमुख पाहुणे शेखर औरंगाबादकर यांच्यासह संजय चंद्रात्रे, प्रशांत गर्गे, अभिजित मुकादम आदी उपस्थित होते. सिडको परिसरातून काढण्यात आलेल्या संचलनासाठी १४६ स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. यावेळी नाशिक शहर संघचालक विजय कदम यांच्यासह सुबोध कुलकर्णी, महेंद्र चित्ते, गजानन देशपांडे, दीपक साबळे आदी उपस्थित होते. तर नाशिकरोड परिसरात १८० सभासदांनी संचलनात सहभाग नोंदवला. कदम लॉन्सपासून सुरू झाल्यानंतर नाशिकरोड देवळालीगाव परिसरातून हे संचलन करण्यात आले. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास भोसला गटाचे संचलन सुरू झाले. यावेळी राजेश जाधव व अतुल देशपांडे उपस्थित होते. व्ही. एन. नाईक महाविद्यालयाच्या परिसरातून या संचलनालयाला सुरुवात झाल्यानंतर गंगापूररोड मार्गे कॉलेजरोड, विसेमळा परिसरातून पुन्हा व्ही. एन. नाईक महाविद्यालयापर्यंत पोहचल्यानंतर संचलनाचा समारोप झाला.संचलनाने नाशिककरांचे वेधले लक्षराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा बदललेला पोषाख लांब पँट, पांढरा शर्ट, काळे बूट, पट्टा, टोपी आणि हातात असलेल्या दंडासह संचलन करणाऱ्या स्वयंसेवकांनी नाशिककरांचे लक्ष वेधून घेतले. सर्व स्वयंसेवकांनी घोष पथकाच्या तालावर संचलन करीत संघाच्या शिस्तीचे दर्शन घडवले.

टॅग्स :NashikनाशिकDasaraदसराRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ