शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

‘प्रहार’चे जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 00:41 IST

जिल्ह्यात पावसाने रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघात होऊन नागरिकांचे बळी जात असल्याने रस्त्यांवरील खड्डे बुजविले जावेत यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना पंधरा दिवसांची मुदत दिलेल्या प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील रस्त्यातील खड्ड्यांमध्ये बसून आंदोलन केले.

नाशिक : जिल्ह्यात पावसाने रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघात होऊन नागरिकांचे बळी जात असल्याने रस्त्यांवरील खड्डे बुजविले जावेत यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना पंधरा दिवसांची मुदत दिलेल्या प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील रस्त्यातील खड्ड्यांमध्ये बसून आंदोलन केले. सुमारे तासभर चाललेल्या या आंदोलनानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना अटक केली.  १ सप्टेंबर रोजी प्रहार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले होते. त्यावेळी रस्त्यावर पडलेले खड्डे त्वरित बुजविण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली होती. पंधरा दिवसांत खड्डे न बुजविल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता.  ‘प्रहार’चे निवेदन घेण्यासाठी जिल्हाधिकाºयांनी नकार दिल्याचा आरोपही यावेळी कार्यकर्त्यांनी केला. एक तास चाललेल्या या आंदोलनानंतर सरकारवाडा पोलिसांनी धाव घेत सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन अटक केली. या आंदोलनात अनिल भडांगे, दत्तू बोडके, किरण गोसावी, अमजद पठाण, जगन काकडे, नितीन गवळी आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.घोषणाबाजीसोमवारी दुपारी तीन वाजता ‘प्रहार’च्या कार्यकर्त्यांनी अचानक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच रस्त्याला पडलेल्या खड्ड्यांमध्ये बसून आंदोलनाला सुरुवात केली. यावेळी कार्यकर्त्यांनी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केल्याने यासंदर्भात तत्काळ पोलिसांना पाचारण करण्यात आले.

टॅग्स :Prahar Apang Krantiप्रहार अपंग क्रांतीcollectorजिल्हाधिकारी