शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
8
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
9
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
10
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
11
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
12
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
13
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
14
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
15
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
16
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
17
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

महावितरण कंपनी कार्यालयाबाहेर आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 19:25 IST

लासलगाव : महावितरणच्या इलेक्ट्रीक पोलवर वाहन आदळल्याने खांब अतिशय जुनाट झाल्याने खशंब वाकून खाली पडला. सुदैवाने दुर्घटना टळली मात्र यासंदर्भात ग्रमस्थांनी प्रसंगावधान राखत वीज वितरण मंपनीच्या कायार्लयात धाव घेतली मात्र तेथे कोणीच नसल्याने संतप्त नागरीकांनी महािवतरणच्या कायार्लयासमोर अधिकारी येई पर्यंत आंदोलन केले.

ठळक मुद्देलासलगाव : विलंबानेही सेवा मिळत नसल्याने संतप्त नागरिक रस्त्यावर

लासलगाव : महावितरणच्या इलेक्ट्रीक पोलवर वाहन आदळल्याने खांब अतिशय जुनाट झाल्याने खशंब वाकून खाली पडला. सुदैवाने दुर्घटना टळली मात्र यासंदर्भात ग्रमस्थांनी प्रसंगावधान राखत वीज वितरण मंपनीच्या कायार्लयात धाव घेतली मात्र तेथे कोणीच नसल्याने संतप्त नागरीकांनी महािवतरणच्या कायार्लयासमोर अधिकारी येई पर्यंत आंदोलन केले.कोटमगाव रस्त्यावर रविवारी (दि.२१) रात्री अकरा वाजेच्या सुमारास ४०७ गाडी (एम एच १५ सीके ७५६) ही महावितरण कंपनीच्या पोलवर रात्री साडे अकरा दरम्यान जाऊन आदळली त्यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. परंतु पोल हे सर्व जुने असल्यामुळे गाडीच्या धक्क्याने पोल खाली पडल्याने सर्व ओव्हरहेड वायर गाडीच्या टपावर पडली./योगायोगाने आजूबाजूस रात्री कोणत्याही प्रकारची वर्दळ नसताना हा प्रकार घडला, परंतु रात्री शिवसेनेचे निफाड तालुका प्रमुख प्रकाश पाटील यांनी महावितरण कंपनीच्या वायरमन यांना फोन करून वायर कट केली. त्यामुळे पुढील दूर्घटना टळली. परंतु गाडीने धडक दिलेले पोलचे काम सकाळी अकरा वाजेपर्यंत कोणत्याही वायरमनने सुरु केले नव्हते.लासलगाव येथील ज्येष्ट नागरिक यांनी हा सर्व प्रकार महावितरण कंपनीच्या ऑफिस येथे जाऊन सांगण्याचा प्रयत्न केला असता तेथे कोणतेही अधिकारी उपलब्ध नसल्यामुळे सर्वांनी अधिकारी येत नाही तो पर्यंत तेथेच ठिय्या मांडला. लासलगाव, चांदवड, नाशिक येथील सर्व अधिकारी बैठकीत तीन-तीन तास व्यस्त होते. त्यामुळे शिवसेना तालुकाप्रमुख पाटील यांनी अखेर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचे स्वीय सहाय्यक खरात यांना फोन केल्याने पुढील महावितरण कंपनीची यंत्रणा सुरळीत प्रमाणे कामाला लागली. सामान्य नागरिकांची दखल लासलगाव येथील महावितरण कंपनीने लवकर न घेतल्यामुळे लासलगाव येथील नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.यवेळी अक्षय ब्राम्हेचा, मोहन आव्हाड, तुषार देवरे, नितीन मापारी, जितेंद्र दगडे, भरत दगडे, सचिन दगडे, सुरेश कुमावत, व्यंकटेश, शरद काळे, नितीन मापारी, योगेश डुकरे, दिपक परदेशी, मयूर दगडे, सुरेश कुमावत, भैय्या वाघ, नाना सूर्यवंशी, विकास जगताप, तुषार देवरे, समीर माठा, लासलगाव पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक सचिन शिंदे, भूषण लोढा, चिराग जोशी, भैया नाईक आदी उपस्थित होते. 

 

 

टॅग्स :SocialसामाजिकPoliceपोलिस