शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
2
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
3
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
4
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
5
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
6
२४ वर्षे जुन्या खटल्यात मेधा पाटकर दोषी
7
विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जूनला मतदान
8
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
9
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
10
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
11
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
12
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल
13
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
14
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
15
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
16
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
17
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
18
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
19
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
20
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर

नासाका सुरू करण्याच्या हालचाली गतिमान

By admin | Published: January 11, 2017 12:51 AM

१२ सदस्य : राज्य शासनाची अशासकीय प्राधिकृ त मंडळाची नियुक्ती

नाशिकरोड : गेल्या चार वर्षांपासून बंद पडलेला नाशिक सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी राज्य शासनाने माजी अध्यक्ष तानाजीराव गायधनी यांच्या अध्यक्षतेखाली १२ जणांचे अशासकीय प्राधिकृत मंडळाची नियुक्ती केली आहे.  सन २०१२-१३ मध्ये नासाकाचा गळीत हंगाम झाल्यानंतर आर्थिक अडचणीमुळे कारखाना बंद पडला. जिल्हा बॅँकेकडे कारखान्याचे थकलेले कर्ज व त्यावरील व्याज यामुळे कारखान्याचे खाते एनपीएत गेल्याने जिल्हा बॅँकेने पतपुरवठा करण्याचे नाकारले. यामुळे कारखाना बंद करण्याची नामुष्की आली होती. संचालक मंडळाची २०१२ ला मुदत संपल्यानंतर एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतरही शासनाने नासाका निवडणुकीसाठी आदेश पारित केले नव्हते. त्यामुळे विद्यमान संचालकांनी प्रादेशिक सहसंचालकाकडे राजीनामे दिल्याने शासनाने कारखान्यावर दोन जणांची शासकीय प्रादेशिक प्राधिकृत मंडळाची नियुक्ती केली होती. त्यांनाही गेल्या दोन वर्षांत कारखाना सुरू करण्यात यश आले नाही. राज्यात भाजपा-सेना युतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर शेतकरी, कामगार, ऊस उत्पादक आदिंनी वेळोवेळी मुख्यमंत्री, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींची भेट घेऊन कारखाना सुरू करण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री गिरीश महाजन यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी खासदार हेमंत गोडसे, आमदार बाळासाहेब सानप, योगेश घोलप, निर्मला गावित, सीमा हिरे, देवयानी फरांदे, राजाभाऊ वाजे, निर्मला गावित, जयंत जाधव या सर्वांना सोबत घेऊन मंत्रालयात सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यासोबत बैठका घेऊन कारखाना सुरू करण्याबाबत चर्चा केली होती.  गेल्या वर्षभरापासून नासाका सुरू करण्याची प्रक्रिया सहकार विभागामार्फत पडताळून पाहिली जात होती. लेखा परीक्षकांचे अहवाल, ऊस उपलब्धता, शेतकऱ्यांची मागणी या सर्व बाबींचा विचार करून शासनाने कारखाना सुरू करण्याचा सकारात्मक निर्णय घेताना शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींचे अशासकीय प्राधिकृत मंडळाची घोषणा केली असून, त्याबाबतचे आदेश प्रादेशिक सहसंचालक अहमदनगर संगीता डोंगरे यांनी सोमवारी पारित केले आहेत. (प्रतिनिधी)