शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

सहाय्यक गटविकास अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 17:21 IST

सिन्नर येथील पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी मागासवर्गीय समाजासाठी असलेल्या शासकीय योजना राबविण्यास जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी मागणी सामाजिक कार्यकर्ते गंगाधर भालेराव, बबनराव जगताप यांनी पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. त्यानंतर गटविकास अधिकारी लता गायकवाड यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

सहायक गटविकास अधिकारी रत्नाकर पगार हे २०१६ पासून सिन्नर येथे कार्यरत आहे. पगार हे तालुक्यातील मागासवर्गीय सरपंच असलेल्या ग्रामपंचायतींना भेटी देवून सरपंचांना त्रास देतात, तसेच चुकीचे काम करण्यात भाग पाडतात, सदस्यांना चुकीची वागणूक देतात, पंचायत समिती मासिक सभेत अनुसुचित जाती जमातींच्या विषयांची इतिवृत्तात नोंद घेत नाही असे आरोप आंदोलनकर्त्यांनी केले. पगार यांच्या काळात अनुसुचित जातीच्या वस्तीत झालेली कामे ही निकृष्ठ असून बहुतेक कामे ही अपूर्ण ठेवण्यात आली. दलित वस्ती योजनेतील बहुतेक कामे अन्य ठिकाणीच केली, रमाई व शबरी आवास योजनेतील लाभार्थ्यांना अद्याप प्रशासकीय मान्यता मिळाली नाही यासह विविध आरोप करण्यात आले. पगार यांना तत्काळ निलंबीत करण्यात यावे अशी मागणी गटविकास अधिकारी लता गायकवाड यांच्याकडे निवेदनाद्वारे यांनी देण्यात आली आहे. धरणे आंदोलनास छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विलास पांगारकर, पंचायत समिती सदस्य तातू जगताप, कॉग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शरद शिंदे, शिवसेना सिन्नर विधानसभा प्रमुख बाळासाहेब सानप, वडगाव सिन्नरचे सरपंच सुनिता आढाव, भारीप बहुजन महासंघाचे तालुकाध्यक्ष सचिन गायकवाड, प्रविण रणशेवरे, समाधान पठारे, वसंत लोहकरे यांनी भेट दिली.

टॅग्स :panchayat samitiपंचायत समितीsuspensionनिलंबन