शहरं
Join us  
Trending Stories
1
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
2
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
3
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
4
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
5
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
6
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
7
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
8
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
9
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
10
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
11
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
12
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
13
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
14
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
15
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
16
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
17
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
18
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
19
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
20
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त

नोटिसा मागे न घेतल्यास आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 00:15 IST

नाशिकरोड : देवळालीगाव शिवारातील शेतकऱ्यांना महसूल मागणीच्या बेकायदेशीर नोटिसा त्वरित मागे न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा माजी आमदार योगेश घोलप यांनी दिला आहे. याबाबत त्यांनी महसूल मंत्र्यांकडे तक्रार केली आहे.

ठळक मुद्देनोटिसांमुळे शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण

नाशिकरोड : देवळालीगाव शिवारातील शेतकऱ्यांना महसूल मागणीच्या बेकायदेशीर नोटिसा त्वरित मागे न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा माजी आमदार योगेश घोलप यांनी दिला आहे. याबाबत त्यांनी महसूल मंत्र्यांकडे तक्रार केली आहे.शेतकऱ्यांना तहसीलदार कार्यालयाकडून महसूल मागणीच्या बेकायदेशीर आलेल्या नोटिसांमुळे शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देवळाली शिवारासाठी एकत्रीकरण कायदाच लागु नाही. त्यामुळे मिळकतधारकाला धारण जमिनीचे तुकडे पाडण्याच्या तरतुदी लागू होत नाही.

शेतकऱ्यांना दिलेल्या नोटिसीत नमूद केलेले कलम हे ज्याने अनाधिकृत, विना परवानगी बिन शेती वापर सुरू केलेला आहे अशा व्यक्तीला लागू होते. बिनशेती वापर ज्या दिवशी निदर्शनास आला, त्या दिवशीचा पंचनामा करून संबंधितांना नोटीस देण्याची तरतूद कायद्यात आहे. मात्र, नोटीस देण्यापूर्वी व आजपर्यंत शेतकऱ्यांच्या क्षेत्राचा पंचनामा झालेला नाही. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १०९ नोटीसधारकांना लागू होत नाही. कारण ते अकृषिक आकारणी बसविण्याबाबत आहे.

वरील मिळकतींमध्ये नोटीसधारकांनी बिनशेती वापर केलेला नाही अथवा सुरूही नाही. त्यामुळे त्यावर अकृषिक आकार बसविता येत नाही. शेतकऱ्यांना कसूरदारास मागणीची नोटीसदेखील लागू होत नाही. मोठ्या व अन्यायकारक रकमांच्या भीतीमुळे शेतकऱ्याने आत्महत्या केली अथवा त्याचा अकाली मृत्यू झाला तर त्याची जबाबदारी प्रशासनावर राहील, असे त्यांनी तहसीलदार व जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयNashikनाशिक