शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

मनमाड जंक्शन रेल्वेस्थानकावरील हमालांचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 00:04 IST

जंक्शन रेल्वेस्थानकावरील परवानाधारक हमालांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी धरणे आंदोलन करून रेल्वे प्रशासनाला निवेदन दिले. या आंदोलनामुळे प्रवाशांना सामान वाहून नेण्यासाठी हाल सहन करावे लागले. वयस्कर हमालांना पेन्शन योजना लागू करावी, वयस्कर व्यक्तींचा परवाना वारसांच्या नावे करण्यासंदर्भात रेल्वे बजेटमध्ये तरतूद करण्यात यावी यासह अन्य मागण्या यावेळी करण्यात आल्या.

मनमाड : जंक्शन रेल्वेस्थानकावरील परवानाधारक हमालांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी धरणे आंदोलन करून रेल्वे प्रशासनाला निवेदन दिले. या आंदोलनामुळे प्रवाशांना सामान वाहून नेण्यासाठी हाल सहन करावे लागले. वयस्कर हमालांना पेन्शन योजना लागू करावी, वयस्कर व्यक्तींचा परवाना वारसांच्या नावे करण्यासंदर्भात रेल्वे बजेटमध्ये तरतूद करण्यात यावी यासह अन्य मागण्या यावेळी करण्यात आल्या.  प्रवाशांचे सामान घेऊन जाणाºया परवानाधारक ६५ हमालांनी असंघटित श्रमिक कामगार युनियनचे नेते बळवंत आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी (दि. २४) अचानक आंदोलनाचा पवित्रा घेत रेल्वेस्थानकाच्या तिकीट बुकिंग आॅफिस येथे धरणे आंदोलन सुरू केले.  हमालांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल झाले. प्रवाशांना सामान स्वत: वाहून न्यावे लागत होते. राजू इप्पर, सुनील पाटील, राजू शिंदे, बाळू ढोणे, प्रल्हाद भोसले यांच्यासह हमाल आंदोलनात सहभागी झाले होते. तर यावेळी रेल्वे पोलीस निरीक्षक एन. के. मदने, वाणिज्य अधिकरी अनिल  बागले, आरपीएफ अधिकारी रणजित यादव, मधुकर सोनवणे, युनियनचे कार्यकर्ते आझाद आव्हाड आदी उपस्थित होते. अशा आहेत मागण्या...हमाल युनियन जिंदाबादची जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. परवानाधारक हमाल रेल्वे प्रवाशांच्या सामानाची ने-आण करतो. परवान्यानुसार लायसन्स फी भरत असल्याने रेल्वे बोर्ड खात्याने आमच्या मागण्यांचा विचार करून काही हमालांना रेल्वेच्या सेवेत सामावून गँगमन, ट्रॅकमन म्हणून रु जू केले; मात्र उर्वरित हमालांना अद्यापही रेल्वेच्या सेवेत सामावून घेतलेले नाही. याबाबत अनेकदा निवेदने देण्यात आली; मात्र विचार केला जात नाही. उर्वरित हमालांना ट्रॅकमन, गँगमन म्हणून रेल्वेत घेण्यात यावे, वयस्कर हमालांना पेन्शन योजना सुरू करावी, वयस्कर हमालांचा परवाना त्यांच्या वारसांच्या नावे करण्यात यावा आदी मागण्यांचे निवेदन स्टेशनमास्तर संजय गलांडे यांना देण्यात आले.

टॅग्स :Nashikनाशिक