शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

संगणक परिचालकांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 18:16 IST

महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागातील ग्रामपंचायतस्तरावर कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करत असलेल्या संगणक परिचालकांनी प्रत्येक महिन्याच्या एक निश्चित तारखेला मानधन मिळावे आणि महाराष्ट्र शासनाच्या आयटी विभागाकडून नेमणूक होणेकामी व इतर मागण्यांसंदर्भात कामबंद आंदोलन छेडले आहे.

ठळक मुद्देतीव्र असंतोष : डिजिटल इंडियाचा पायाच कोलमडणार

खेडलेझुंगे : महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागातील ग्रामपंचायतस्तरावर कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करत असलेल्या संगणक परिचालकांनी प्रत्येक महिन्याच्या एक निश्चित तारखेला मानधन मिळावे आणि महाराष्ट्र शासनाच्या आयटी विभागाकडून नेमणूक होणेकामी व इतर मागण्यांसंदर्भात कामबंद आंदोलन छेडले आहे.शासनाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संगणक परिचालकांना दिलेला शब्द मागील ८ म्ािहन्यांपासून पाळला नाही. त्यामुळे राज्यभरातील संगणक परिचाल कांमध्ये तीव्र असंतोष दिसून येत आहे. सोमवारी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या सर्व संगणक परिचालकांनी बेमुदत कामबंद आंदोलनात सहभाग घेतलेला आहे. सन २०११ पासून संग्राम व सध्या आपले सरकार सेवा केंद्र अंतर्गत राज्यातील ग्रामपंचायतीमधील संगणक परिचालक डिजिटल महाराष्ट्रचे काम करीत आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्याचा डिजिटल इंडियामध्ये चमकदार कामागिरी दिसून येत आहे. या शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनांचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी एप्रिल २०१९ पासून मानधन मिळालेले नाही. त्यामुळे संगणक परिचालकांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. मानधन, कंत्राटी पदे यांसारख्या अनेक समस्यांनी पीडित असलेल्या हजारो संगणक परिचालकांनी १९ आॅगस्टपासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे डिजिटल महाराष्ट्राचे कामकाज ठप्प होणार असून, नागरिकांचे, शेतकरी व विद्यार्थ्यांचे हाल होणार आहेत.निफाड तालुका संगणक परिचालक संघटनेच्या वतीने पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप कराड यांना तालुका अध्यक्ष तुषार पानगव्हाण, प्रवीण मोरे, अक्षय सानप, उमर काद्री, महेश कापसे, अंकुश गाढवे, माधुरी खोडे, संध्या केदारे, कल्पना जाधव यांनी निवेदन दिले. जोपर्यंत शासनाकडून महाराष्ट्र आयटी महामंडळात समावेशासह इतर मागण्या मान्य होत नाहीत ता पर्यंत बेमुदत कामबंद आंदोलन सुरूच राहील. या आंदोलनाबरोबर आणखी वेगवेगळे आंदोलने सुरू करण्यात येतील, असे संघटनेकडून सांगण्यात आले.

टॅग्स :NashikनाशिकGovernmentसरकारagitationआंदोलन