राष्टÑवादी कॉँग्रेसच्या वतीने आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 12:15 AM2018-10-13T00:15:58+5:302018-10-13T00:45:39+5:30
संभाजी महाराजांबाबत वादग्रस्त लिखाण करणाऱ्या डॉ. शुभा साठेंवर फौजदारी गुन्हा दाखल करून वादग्रस्त पुस्तकाची मान्यता त्वरित रद्द करावी या मागणीसाठी राष्टÑवादी कॉँग्रेसने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी राज्य व केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून जिल्हाधिकाºयांना निवेदन सादर केले.
नाशिक : संभाजी महाराजांबाबत वादग्रस्त लिखाण करणाऱ्या डॉ. शुभा साठेंवर फौजदारी गुन्हा दाखल करून वादग्रस्त पुस्तकाची मान्यता त्वरित रद्द करावी या मागणीसाठी राष्टÑवादी कॉँग्रेसने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी राज्य व केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून जिल्हाधिकाºयांना निवेदन सादर केले.
या निवेदनात म्हटले आहे की, राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्यदैवत आहे. असे असतानाही छत्रपती संभाजी महाराजांबद्दल वादग्रस्त ओळ डॉक्टर शुभा साठे यांनी त्यांच्या समर्थ श्री रामदास स्वामी या पुस्तकात लिहिली आहे.
समर्थ रामदास स्वामी या पुस्तकात लिहिलेल्या वादग्रस्त ओळीमुळे शिवछत्रपती संभाजी महाराज यांची बदनामी झाली आहे. सर्वशिक्षा अभियानाअंतर्गत छापलेल्या पाठ्यपुस्तकात डॉ. शुभा साठे यांनी जाणीवपूर्वक छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी बदनामी करणारे व गैरसमज पसरविणारे लिखाण या पुस्तकातून केले आहे. त्यांचे हे वादग्रस्त पुस्तक महाराष्ट्र सरकारने सर्वशिक्षा अभियानातून मागे घ्यावं व शुभा साठे यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. राष्टÑवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना निवेदन सादर केले.
यावेळी शहर सरचिटणीस संजय खैरनार, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, धनंजय निकाळे, सलीम शेख, किशोर शिरसाठ, मुजाहिद शेख, जीवन रायते, कुणाल बोरसे, राजेंद्र शेळके, अॅड.चिन्मय गाढे, मुन्ना पाटील, मोतीराम पिंगळे, दिलीप दोंदे, सद्दाम शेख, बाबा चव्हाण, कय्युम शेख, राजेंद्र पगारे, राहुल पगारे कार्यकर्ते उपस्थित होते.