शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वारसा हक्क नोकरीसाठी आझाद मैदानात आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2021 01:47 IST

राज्यातील महापालिकांमध्ये स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना स्वेच्छा निवृत्ती आणि वारसा नोकरीची संधी देताना जातीचा निकष लावला जात असल्याने इतर संवर्गातील कर्मचारी या सुविधांपासून वंचित आहेत. त्यांनादेखील स्वच्छता कर्मचारी म्हणूनच सेवा मिळाव्यात, या मागणीसाठी मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

नाशिक : राज्यातील महापालिकांमध्ये स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना स्वेच्छा निवृत्ती आणि वारसा नोकरीची संधी देताना जातीचा निकष लावला जात असल्याने इतर संवर्गातील कर्मचारी या सुविधांपासून वंचित आहेत. त्यांनादेखील स्वच्छता कर्मचारी म्हणूनच सेवा मिळाव्यात, या मागणीसाठी मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन सुरू करण्यात आले आहे. जोपर्यंत शासनाकडून लेखी मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वारसा हक्क संघटना समन्वय समितीच्या माध्यमातून मुंबईत या मुद्द्यावर आंदोलन सुरू करण्यात आले असून, नाशिकमधून किमान २०० कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले आहेत. समितीच्या नेत्या तथा कल्याण डोंबिवली महापालिकेच्या नगरसेवक असलेल्या खुशबू चौधरी या आंदोलनाचे नेतृत्व करीत असून, त्यांनी या प्रकरणी समाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेत निवेदन दिले.निवेदनात म्हटले आहे की, लाड पागे शिफारशीनुसार वारसा हक्काने नोकरी यापूर्वी मिळत हाेती. परंतु ११ मार्च २०१६ नुसार फक्त अनुसूचित जाती जमाती वर्गातील कामगारांच्या वारसांनाच न्याय दिला जातो. ओबीसी, भटक्या जमाती यांना मात्र न्याय मिळत नाही. जातीनिहाय विचार न करता सफाई कर्मचारी म्हणून वारसा हक्क मिळावा, अशी मागणी करण्यात आली आहे.--कोट--लेखी नसल्याने आंदोलन सुरूचवारसा हक्काच्या मागणीसाठी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंढे यांना निवेदन देण्यात आल्यानंतर त्यांनी दोन आठवड्यांत याबाबत कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र याबाबतचे लेखी मिळणे अपेक्षित असून, लेखी मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही.- खुशबू चौधरी, अध्यक्ष, वारसा हक्क संघटना समन्वय समिती.
टॅग्स :Nashikनाशिकagitationआंदोलन