शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये डंका; दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'हे' पक्ष आघाडीवर
2
एक्झिट पोलमध्ये भाजपला प्रचंड बहुमत; प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
Arvind Kejriwal : "जेलमध्ये तुमचे केजरीवाल..."; सरेंडर करण्याआधी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शेड्यूल
4
आम्हाला फक्त भारताविरूद्धच नाहीतर वर्ल्ड कप देखील जिंकायचाय - बाबर आझम
5
"कठीण प्रसंग येतातच, मी पळ काढणार नाही", Hardik Pandya ने सांगितला खडतर प्रवास
6
कंगना, कन्हैया, संबित पात्रा, अन्नामलाई, विशाल पाटील यांच्या हॉट सिटवर असा आहे एक्झिट पोल
7
'मालवणच्या समुद्रकिनारी तब्बूचा फोन...', छाया कदम यांनी सांगितला मजेशीर किस्सा
8
इंडिया आघाडीला महाराष्ट्र, बिहार, कर्नाटकात धक्कादायक आकडे; एक्झिट पोलमध्ये विरोधी पक्षांनी 'या' राज्यात मारली बाजी
9
अभिनेता आस्ताद काळेने लिव्ह-इन रिलेशनशीप अन् पीजीमध्ये राहणाऱ्या तरुणाईला दिला 'हा' मोलाचा सल्ला
10
"लोकसभा निवडणुकीचा एक्झिट पोल फ्रॉड, हे भाजपाला ८००,९०० जागाही देतील"; संजय राऊतांचा आरोप
11
टीम इंडियाचा स्टार अय्यर अडकला विवाहबंधनात; 'श्रुति'ला बनवले आयुष्याचा जोडीदार
12
"टूथब्रश न्यायला विसरु नका कारण..."; तुरुंगात जाण्यापूर्वी केजरीवालांना परेश रावलचा सल्ला
13
चारशे पार सोडा, मोदी आणि एनडीएला २५० जागाही मिळणार नाहीत, या एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज 
14
दारू पिऊन गाडी चालवू नका! पुण्यात २ दिवसांत १५४ वाहनचालकांवर ‘ड्रंक ॲण्ड ड्राइव्ह’ची कारवाई
15
मतदान आटोपताच बंगालमध्ये भाजपा कार्यकर्त्याची हत्या, हल्लीच केला होता भाजपात प्रवेश  
16
PICS : षटकारांचा पाऊस! अमेरिकेच्या शिलेदारानं रचला इतिहास; सलामीच्या सामन्यात यजमानांचा दबदबा
17
१ जूनपासून बदलले महत्त्वाचे नियम, थेट तुमच्या जगण्याशी आहे संबंध!
18
खळबळजनक! नांदेडमध्ये मशीन गनचे ३९१ राऊंड कालव्यात सापडले
19
साप्ताहिक राशीभविष्य : ७ राशींना धनलाभ होणार, शुभवार्ता समजणार; सुख-समृद्धीचा काळ!
20
"गौतम गंभीरनं टीम इंडियाच्या कोचपदासाठी अर्ज केला असेल तर...", गांगुलींचं रोखठोक मत

कळवणला सकल मराठा समाजाचा मोर्चा, चक्काजाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2018 5:24 PM

आरक्षणसह विविध मागण्या : शिस्तबद्धतेचे दर्शन, संपूर्ण व्यवहार बंद

ठळक मुद्देमराठा समाज बांधवांनी हजारोच्या संख्येने कळवणच्या रस्त्यावर उतरु न सरकारचे लक्ष वेधून घेतलेमागण्या मान्य केल्या नाहीत तर एल्गार पुकारण्याचा इशाराही समाजाच्या युवतींनी चक्का जाम आंदोलनप्रसंगी दिला

कळवण- मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी सकल मराठा समाजाचा झंझावात कळवणमध्ये गुरु वारी (दि.९) दिसून आला. मराठा समाज बांधवांनी हजारोच्या संख्येने कळवणच्या रस्त्यावर उतरु न सरकारचे लक्ष वेधून घेतले तर मागण्या मान्य केल्या नाहीत तर एल्गार पुकारण्याचा इशाराही समाजाच्या युवतींनी चक्का जाम आंदोलनप्रसंगी दिला.स्वंयशिस्तीचा आदर्श ठरणारा हा मोर्चा कळवण न्यायालयापासून निघाला. घोषणाबाजी करत मोर्चा गणेशनगर, नगरपंचायत, सुभाषपेठ, फुलाबाई चौकातून अंबिका चौक मार्गे मेनरोडवरु न एसटी बस स्थानकावर आला. याठिकाणी ठिय्या मांडून चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यावेळी नेहा पाटील,शरण्या गांगुर्डे, सानिया पगार, साक्षी सोनवणे ,प्रांजली वाघ,श्रावणी वाघ,ऋतिका शिंदे,अदिती निकुंभ, पलक बच्छाव,ममता जाधव यांनी समाजाच्या मागण्या मांडल्या. मोर्चेकऱ्यांनी वापरलेली ‘आम्ही मराठा’असे लिहिलेली गांधी टोपी लक्ष वेधून घेत होती. मोर्चात प्रथमस्थानी महिला व विद्यार्थिनी तर शेवटच्या स्थानावर राजकीय नेते होते. तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी या मोर्चात सहभाग नोंदवत समाजासाठी एकी दाखवली. मोर्चा संपताच परतीच्या वाटेवर असलेल्या मराठ्यांनी स्वयंशिस्त दाखवत, कचरा, प्लॅस्टिक पिशव्या उचलून घेतल्या. सूत्रसंचालन दीपक हिरे यांनी केले. तर प्रदीप पगार यांनी आभार मानले. त्यानंतर आंदोलनस्थळी तहसीलदार कैलास चावडे ,पोलीस निरीक्षक एस.जी.मांडवकर यांना युवतींनी निवेदन दिले.पाऊस अन् कडकडीत बंदमराठा आरक्षण संदर्भात चक्का जाम आंदोलन पाशर््वभूमीवर बुधवारी (दि.८) रात्री व गुरु वारी सकाळी पावसाच्या सरी कोसळत होत्या. परंतु, पावसाने सकाळी विश्रांती घेतल्याने मोर्चात हजारोच्या संख्येने समाज बांधव सहभागी झाले. पुकारण्यात आलेल्या चक्का जाम मुळे शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. कळवण आगारातून दिवसभरात एकही बस बाहेर पडली नाही.नगरपंचायत करणार ठरावमराठा आरक्षण चक्का जाम आंदोलनात नगरपंचायतच्या नगरसेवकांनी सहभागी होऊन मागण्यांना पाठींबा दिला. नगरपंचायतच्या बैठकीत मराठा समाजाला तत्काळ आरक्षण द्यावे या मागणीचा ठराव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , मागासवर्गीय आयोग यांना पाठविणार असल्याची माहिती उपनगराध्यक्ष कौतिक पगार यांनी दिली.

टॅग्स :NashikनाशिकMorchaमोर्चा