शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या करवाढीविरोधात आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 01:16 IST

महापालिकेच्या प्रस्ताविक घरपट्टी व पाणीपट्टी दरवाढीच्या विरोधात महाराष्टÑ नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून, शनिवारी (दि.२४) सावतानगर, सिडको येथे घरपट्टी व पाणीपट्टीच्या झेरॉक्स बिलांची होळी करून प्रशासनाचा निषेध करण्यात आला.

सिडको : महापालिकेच्या प्रस्ताविक घरपट्टी व पाणीपट्टी दरवाढीच्या विरोधात महाराष्टÑ नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून, शनिवारी (दि.२४) सावतानगर, सिडको येथे घरपट्टी व पाणीपट्टीच्या झेरॉक्स बिलांची होळी करून प्रशासनाचा निषेध करण्यात आला. महापालिकेने सर्वसामान्य नागरिकांना न परवडणारी अशी घरपट्टी व पाणीपट्टीत वाढ करण्याची तयारी सुरू केली असून, यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या करवाढीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष अनिल मटाले, विभाग अध्यक्ष रामदास दातीर, सरचिटणीस अ‍ॅड. अतुल सानप, महिला आघाडीच्या कामिनी दोंदे यांच्या नेतृत्वाखाली सावतानगर येथे घरपट्टी व पाणीपट्टीच्या बिलांची होळी करण्यात आली. सत्ताधारी पक्षाकडून सर्वसामान्य नाशिककर, कष्टकरी कामगार व स्वयंरोजगारी करणारे, चाकरमाने अशा सर्वांवरच अन्यायकारक करवाढ केली असून, नागरिकांची दिशाभूल करण्यात आली असल्याचा आरोप मनसेच्या वतीने करण्यात आला आहे. मनपा प्रशासनाने मोठ्या प्रमाणात केलेल्या करवाढीमुळे शहरासह सिडको भागातील नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली असून याबाबत मनपाने विचार करून दरवाढ माघे घ्यावी अन्यथा यापुढील काळात नागरिकांच्या प्रश्नासाठी मनसे अधिक आक्रमक भूमिका घेणार असल्याचे सांगत मनसेच्या वतीने प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करून निषेध करण्यात आला. यावेळी गणेश मोरे, बाजीराव दातीर, संजय दातीर, अरुण दातीर, प्रणव मानकर, सुधाकर टाव्हरे, विशाल फडोळ, प्रशांत ठाकरे, धीरज भोसले, अरुणा पाटील, धनश्री ढोले आदी सहभागी झाले होते.मनपाच्या वतीने सर्वसामान्य नागरिकांना न परवडणारी अशी भरमसाठ करवाढ केली आहे. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून, मनपाने करवाढीबाबत विचार करून ती त्वरित मागे घ्यावी, अन्यथा यापुढील काळात मनसे नागरिकांच्या प्रश्नाबाबत आक्रमक भूमिका घेत मनपा प्रशासनाच्या विरोधात मनसे स्टाइल आंदोलन छेडणार.- अनिल मटाले, शहराध्यक्ष, मनसे

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाMNSमनसे