नाशिकरोड : मराठा क्रांती मूक मोर्चा जनजागृती करण्यासाठी नाशिक तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमधून मराठा समाजाच्या युवकांनी जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा देत दुचाकी रॅली काढली होती. मराठा क्रांती मोर्चाच्या जनजागृतीसाठी पळसे-शिंदे गाव परिसरातील ५००-६०० मराठा समाज युवकांनी दुचाकीला भगवे झेंडे बांधून जय भवानी, जय शिवरायचा जयघोष करत रविवारी दुचाकी रॅली काढली होती. सदर रॅली मोहगाव, बाभळेश्वर, जाखोरी, शिंदे, नासाका, नानेगाव, शेवगेदारणा, कोटमगाव आदि गावातून काढली होती. सदर रॅलीचे गावागावात स्वागत करून त्या गावातील युवक रॅलीमध्ये सहभागी होत होते. मळे, गावठाण परिसर, वाडी वस्ती आदि ठिकाणहून रॅली काढून मराठा समाजबांधवांना, महिलांना मोर्चात शांततेने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत होते. (प्रतिनिधी)
मोटारसायकल रॅली
By admin | Updated: September 20, 2016 01:54 IST