शहरं
Join us  
Trending Stories
1
महसूल मंत्र्यांचा दुय्यम निबंधक कार्यालयातच छापा; अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये आढळले पैसे
2
संपादकीय: ...आता थेट मुकाबला ! आनंदाचा शिधा देणार नसले, तरी... 
3
आजचे राशीभविष्य- ७ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस शुभ फलदायी, 'या' राशींची होणार भरभराट!
4
सरन्यायाधीशांवर वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न ; ‘सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही’ अशा घोषणा देत कोर्ट सुरू असतानाच केला हल्ला 
5
कोणत्या नगरपरिषद, नगरपंचायतीसाठी कोणते आरक्षण; सोडत निकाल वाचा एका क्लिकवर... 
6
वांगचूक यांना अटक; केंद्र सरकार, लडाखला नोटीस; तत्काळ सुटका करण्याची सर्वोच्च न्यायालयात मागणी 
7
बिहार विधानसभेचा बिगुल अखेर वाजला; दोन टप्प्यांत मतदान, तर १४ नोव्हेंबरला निकाल   
8
मुंबई महापालिकेची अंतिम प्रभागरचना मंजूर; निवडणूक प्रक्रियेला वेग, मतदार याद्यांची प्रतीक्षा 
9
२४७ नगरपरिषदांमध्ये १२५ नगराध्यक्षपदे महिलांसाठी; तर १४७ नगरपंचायतींमध्ये ७३ महिलांसाठी राखीव 
10
ब्रुनको, रॅम्सडेल व साकागुची यांना मेडिसिनचे नोबेल; टी-पेशींचा शोध, कर्करोग आणि मधुमेहावर उपयुक्त
11
७ कोटींच्या घरांना ग्राहक मिळाले नाहीत, तर म्हाडा घरे भाड्याने देणार
12
अमेरिकन गरुड, चिनी ड्रॅगन आणि भारतीय हत्ती!
13
लादेनच्या डोक्यात अमेरिकी नेव्ही सीलनेच गोळी झाडली होती, हे इतिहास विसरणार नाही : ट्रम्प
14
चंद्रभ्रमंती करून ‘स्पेस फ्लाइट’ने घरी परत याल, तेव्हा...
15
तरुणाई ठरवणार बिहारचा मुख्यमंत्री?
16
विशेष न्यायालयाचा दोघांची सुटका करण्यास नकार; बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण, सरकारी वकिलांची माहिती  
17
अपहरण केले, पण चांगले खायला दिले; दिलीप खेडकरचा असाही बचावात्मक पवित्रा
18
परप्लेक्सिटीचा तांत्रिक बिघाड सोडवला, १ कोटीची नोकरी मिळाली; पालघर जिल्ह्यातल्या जितेंद्रची झाली निवड
19
पालकांचा सांभाळ मुलांनी केलाच पाहिजे; बक्षिसपत्राविषयी उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
20
अतिवृष्टीचे निकष बदलून शेतकऱ्यांना करणार मदत; बुजलेल्या विहिरींनाही मदतीचा प्रस्ताव

भाजलेल्या चिमुकलीला उपचार मिळविण्यासाठी मातेची धडपड कॉलेज रोड : फिरस्त्या मायलेकीला ह्य१०८ह्ण रुग्णवाहिकेने दिला दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 00:48 IST

नाशिक : शहरातील कॉलेज रोड भागात भटकंती करत लोकांकडे हात पुढे करून मिळेल ते दान पदरात घेत, आपला व कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करणाऱ्या एका मातेची धडपड तिच्या भाजलेल्या बाळाला वैद्यकीय उपचार मिळावे, यासाठी मागील दोन दिवसांपासून सुरू होती.

अझहर शेखनाशिक : शहरातील कॉलेज रोड भागात भटकंती करत लोकांकडे हात पुढे करून मिळेल ते दान पदरात घेत, आपला व कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करणाऱ्या एका मातेची धडपड तिच्या भाजलेल्या बाळाला वैद्यकीय उपचार मिळावे, यासाठी मागील दोन दिवसांपासून सुरू होती. बुधवारी (दि.१०) ही माता आपल्या दोन वर्षांच्या चिमुकलीला खांद्यावर घेऊन कॉलेज रोड भागात दिवसभर भटकंती करत होती. मात्र, कोणत्याही दवाखान्यात या गोरगरीब मायलेकीला दाद मिळू शकली नाही, अखेर शासनाच्या ह्य१०८ह्ण रुग्णवाहिकेने आलेल्या ह्यकॉलह्णला प्रतिसाद देत धाव घेतली अन‌् त्या मायलेकींना सायंकाळी रेस्क्यू केले.मूळ औरंगाबाद जिल्ह्यातील असलेल्या या मायलेकी काही वर्षांपूर्वी नाशकात रोजगाराच्या शोधात आल्या. मात्र, कुठेही रोजगार मिळाला, तर त्याचे ह्यमोलह्ण मिळू शकले नाही. नियतीने पदरात टाकलेले अठराविश्वे दारिद्र्य झेलत, या महिलेने अखेर समाजापुढे हात पसरण्याचा मार्ग नाईलाजाने स्वीकारला. रस्त्यालगत उघड्यावर मांडलेल्या चुलीवर पोटाची भूक शमविण्यासाठी भाकरी थापत असताना मातेची नजर चुकली अन‌् दुर्घटना घडली. पंधरवड्यापूर्वीच चिमुकल्या लेकीला आगीच्या ज्वालांची झळ बसल्याने तिची पाठ पूर्णत: भाजली गेली. एक वेळच्या जेवणाची भ्रांत असलेल्या या मातेपुढे आपल्या लेकीच्या उपचाराचा मोठा प्रश्न उभा राहिला. तिने शहरातील उच्चभ्रू भागात जेथे दिवसभर भटकंती करत हात पुढे करते, त्या भागातील दवाखान्यांचा उंबराही गाठला. मात्र, पदरी पडली ती निराशाच...!-इन्फो--कडाक्याच्या थंडीमुळे असह्य वेदना अन‌्....चिमुकलीच्या भाजलेल्या पाठीच्या जखमा भरून न आल्यामुळे कडाक्याच्या थंडीने तिला असह्य वेदना मंगळवारी रात्रीपासूनच होऊ लागल्या होत्या. तात्पुरत्या स्वरूपात ह्यदानाह्णमधून मिळालेल्या रकमेतून त्या मातेने एका मेडिकलमधून मलम घेत, त्या लेकीच्या जखमांवर लावण्याचा प्रयत्नही केला. काही वेळ दिलासा मिळाला. मात्र, संध्याकाळी हवेत गारवा निर्माण होताच, पुन्हा वेदनांनी लेकीचे अश्रू घळाघळा वाहू लागल्याने मातेचे मन हेलावून गेले.--इन्फो--ह्यफूड डिलिव्हरी बॉयह्णची जागरूकतामातेची धडपड अन चिमुकलीची भाजलेली पाठ बघून येथील एका रेस्टॉरंटजवळ आलेल्या फूड डिलिव्हरी करणाऱ्या सुशिक्षित जागरूक युवकाचे संवेदनशील मन हादरून गेले. त्या मातेला धीर देण्याचा प्रयत्न केला आणि प्रसंगावधान राखत मोबाइलवरून तत्काळ ह्य१०८ह्ण क्रमांक फिरविला. काही वेळेत डॉ. शिल्पा पवार या १०८ रुग्णवाहिकेतून कॉलेज रोड येथे दाखल झाल्या अन‌् तेथील विठूमाउली मंदिराच्या उंबऱ्यावर बसलेल्या या मायलेकीला रेस्क्यू करत रुग्णवाहिकेतून जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. 

टॅग्स :hospitalहॉस्पिटलNashikनाशिक