शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

बालिका खूनप्रकरणी  संशयावरून आईला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 01:01 IST

अवघ्या चौदा महिन्यांच्या तान्हुलीच्या नाजूक गळ्यावर चक्क ब्लेडने वार करून खून केल्याची संतापजनक अन् तितकीच हृदयद्रावक घटना मंगळवारी (दि.१६) दुपारच्या सुमारास उघडकीस आली.

पंचवटी : अवघ्या चौदा महिन्यांच्या तान्हुलीच्या नाजूक गळ्यावर चक्क ब्लेडने वार करून खून केल्याची संतापजनक अन् तितकीच हृदयद्रावक घटना मंगळवारी (दि.१६) दुपारच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेनंतर पोलीस प्रशासनही चक्रावून गेले होते. रात्री उशिरापर्यंत गुन्ह्याची उकल व संशयितापर्यंत पोलीस पोहोचलेले नव्हते, मात्र आडगाव पोलिसांनी स्वरा मुकेश पवार या बालिकेच्या खुनाच्या संशयावरून परिस्थितीजन्य पुराव्यांआधारे आई योगीता मुकेश पवार हिला बुधवारी (दि.१७) अटक केली. संशयित आरोपीपर्यंत पोलिसांना पोहोचता आले असले तरी चिमुकलीच्या खुनाचे कारण मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.औरंगाबादरोडवर असलेल्या साई पॅराडाईज अपार्टमेंटमध्ये दुपारी स्वराचा अत्यंत क्रूरपणे खून केल्याची घटना उघडकीस आली. भरवस्तीत घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त होत होती.घटनेनंतर पोलिसांनी योगीताकडे चौकशी केली असता तिने दुपारी कचरा टाकण्यासाठी जात असताना अज्ञात इसम तोंडाला रूमाल बांधून घरात चाकू घेऊन शिरला. त्याने दागिन्यांची मागणी करत माझ्यासह स्वरावर वार केले व तो पळून गेल्याचे सांगितले.मात्र पोलिसांनी याबाबत सर्व शक्यता पडताळून धागेदोरे जुळवत घटनास्थळी आढळून आलेल्या परिस्थितीजन्य पुराव्यानुसार पडताळणी करून स्वराचा खून झाला तेव्हा घरात योगीताच्या व्यतिरिक्त कोणीही नव्हते, या निष्कर्षावर पोलिसांनी शिक्कामोर्तब केले. योगीता चोरीचा बनावट प्रसंग सांगत असल्याची पोलिसांची खात्री झाली आणि पोलिसांनी दुपारी योगीताला बेड्या ठोकल्या.बालिकेच्या खुनाचा उलगडा करत असताना बालिकेच्या आईने वेगवेगळी कारणे सांगून पोलिसांची दिशाभूल करत खुनी मी नव्हेच, अशी भूमिका घेतल्याने पोलीसही बुचकळ्यात पडले होते. घटनेनंतर तत्काळ उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली, गुन्हे शाखा युनिट-१चे पथक, श्वान पथक, वैज्ञानिक न्याय सहायक पथक दाखल झाले होते. ज्या फ्लॅटमध्ये स्वराचा खून झाला तेथून नेलकटर, धारदार ब्लेड, तत्सम वस्तू पोलिसांना आढळून आल्या आहेत. संशयित योगीता बनाव करत असल्याची खात्री पोलिसांना बुधवारी दुपारी पटली. अखेर पोलिसांनी स्वराच्या आईला खुनाच्या संशयावरून बेड्या ठोकल्या.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीMurderखून