शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आई ती आईच... बाळासाठी पाइपवरून चढल्या चौथ्या मजल्यावरील घरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2023 03:59 IST

घरात शिरताच त्यांनी आधी बाळाला पोटाशी धरले अन् मग बंद झालेला दरवाजा उघडला.

सुनील साळुंखे 

शिरपूर (जि. धुळे) : दीड महिन्याच्या बाळाला घरात ठेवून कचरा टाकण्यासाठी २८ वर्षीय विवाहिता गॅलरीत आल्या. अचानक गॅलरीचा दरवाजा हवेमुळे बंद झाला. त्यातच घराचा मुख्य दरवाजाही आतून बंद होता. बाळ घरात एकटाच असल्याने ती कासावीस झाली. मात्र, क्षणाचाही विलंब न करता ती लोखंडी ग्रीलच्या साह्याने तिसऱ्या मजल्यावरील पायऱ्यांवर उतरल्या. तेथून पाइपच्या साह्याने चौथ्या मजल्यावर जाऊन, मागच्या दरवाजातून घरात प्रवेश केला आणि बाळाला बघताच तिला अश्रू अनावर झाले. ही घटना आहे, नाशिकच्या पेठ भागातील. तृप्ती जगदाळे-सोनार असे मातेचे नाव आहे.

घरात कसे जावे? असा प्रश्न त्यांच्यापुढे पडला. मात्र, मागील दरवाजा उघडा असल्याचे त्यांच्या लक्षात आले. तिथे पोहोचण्यासाठी त्यांनी काही क्षणाचाही विलंब न करता ग्रीलच्या साह्याने गॅलरीतून तिसऱ्या मजल्यावर उतरल्या. त्यानंतर मागच्या बाजूला जाऊन पाइपाच्या साह्याने, परत चौथ्या मजल्यावर गेल्या आणि तेथून घरात प्रवेश केला. 

घरात शिरताच त्यांनी आधी बाळाला पोटाशी धरले अन् मग बंद झालेला दरवाजा उघडला आणि सुटकेचा निःश्वास सोडला. क्षणभराचा किस्सा; पण गोंधळून टाकणारा. संध्याकाळी सर्वजण घरी आल्यावर सर्वांना ही गोष्ट कळली. सध्या तिच्या हिमतीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

हवेने दरवाजा बंद झाला...२२ मे रोजी सकाळी घरात कोणी नसल्याने, त्या मुख्य दरवाजा आतून बंद करून कचरा टाकण्यासाठी गॅलरीत गेल्या. यावेळी मल्हार घरात झोपलेला होता. अचानक हवेमुळे गॅलरीचा दरवाजा बंद झाल्याने, त्या बाहेरच राहिल्या.

दाेघेच का थांबले?मूळचे शिरपूर (जि. नाशिक) येथील रहिवासी असलेले जगदाळे-सोनार कुटुंबीय सध्या नाशिकच्या पेठ भागातील अष्टविनायकनगर येथे एका सोसायटीतील चौथ्या मजल्यावर  वास्तव्यास आहे. पती स्वप्नील हे तीन वर्षीय मुलगी मृण्मयी हिच्यासह नातेवाइकांकडील साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी २१ मे रोजी शिरपूरला आले होते. मात्र, उन्हाचा त्रास होईल, म्हणून पत्नी तृप्ती आणि दीड महिन्यांचे बाळ मल्हार हे नाशिकलाच थांबले होते. 

टॅग्स :Nashikनाशिक