शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
4
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
5
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
6
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
7
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
8
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
9
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
10
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
11
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
12
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
13
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
14
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
15
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
16
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
17
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
18
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
19
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
20
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
Daily Top 2Weekly Top 5

औषधनिर्माण शास्त्र अभ्यासक्रमास विद्यार्थ्यांची सर्वाधिक पसंती ; गतवर्षी ९८ टक्क्यांहून अधिक प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 17:04 IST

गेल्या काही वर्षांपासून या अभ्यासक्रमास प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची सर्वाधिक पसंती मिळत असून, त्यामुळेच गतवर्षी पदवीला ९८.०२ टक्के तर पदविकेला ९८.७९ टक्के जागांवर प्रवेश झाले होते. त्यामुळे बारावीनंतरच्या प्रवेशप्रक्रियेची चाचपणी करताना औषधनिर्माण शास्त्र अभ्यासक्रमाचा पर्याय विद्यार्थी व पालकांसाठी उत्तम ठरू शकणारा आहे.

ठळक मुद्दे नाशिक विभागात बी फार्मच्या ४१५० जागाडी फार्मसाठी ४९१५ प्रवेश क्षमता

नाशिक : बारावीनंतरच्या प्रवेशप्रक्रियेची चाचपणी करताना औषधनिर्माण शास्त्र अभ्यासक्रमाचा पर्याय विद्यार्थी व पालकांसाठी उत्तम ठरू शकणारा आहे. नाशिक विभागात औषधनिर्माण शास्त्र पदवीसाठी एकूण ५३ महाविद्यालयांमध्ये ४ हजार १५० विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता असून, ७६ महाविद्यालयांमध्ये पदविकेच्या विद्यार्थ्यांसाठी ४ हजार ९१५ जागा उपलब्ध आहेत. गेल्या काही वर्षांपासून या अभ्यासक्रमास प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची सर्वाधिक पसंती मिळत असून, त्यामुळेच गतवर्षी पदवीला ९८.०२ टक्के तर पदविकेला ९८.७९ टक्के जागांवर प्रवेश झाले होते. आयसीएस व सीबीएसईसोबतच एसएससी बोर्डाच्या परीक्षांचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांसह त्याच्या पालकांकडूनही पुढील प्रवेशासाठी पर्यायांची चाचपणी सुरू झाली आहे. यात बारावी विज्ञान शाखेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभियांत्रिकीसोबतच औषधनिर्माण शास्त्र अभ्यासक्रमाच्या पदवी आणि पदविका असे अन्य पर्याय उपलब्ध आहेत. विभागातील नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक २० बी फार्मसी महाविद्यालयांमध्ये बी.फार्मसी अभ्यासक्रमाच्या १४७० जागा उपलब्ध असून, डी.फार्मसाठीच्या २४ महाविद्यालयांमध्ये १५३०, अहमदनगरमधील १४ बी.फार्मसी महाविद्यालयांमध्ये १०८०, तर २२ डी.फार्मसी महाविद्यालयांमध्ये १३८०, धुळ्यात बी.फार्मसीच्या ८ महाविद्यालयांध्ये ७८० तर, डी फार्मसीच्या ११ महाविद्यालयांमध्ये ७७० जागा उपलब्ध आहे. जळगावात बी.फार्मसीच्या आठ महाविद्यालयांमध्ये ६०० जागा असून, डी.फार्मसीच्या १४ महाविद्यालयांमध्ये ८८५ प्रवेशांची क्षमता आहे. नंदुरबारमध्ये बी.फार्मसी अभ्यासक्रमाची केवळ तीन महाविद्यालये असून, येथे २२० विद्यार्थी क्षमता आहे, तर डी.फार्मसीसाठी पाच महाविद्यालयांमध्ये ३६० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकणार आहे. विभागात नाशिकसह अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यांमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणारी यातील विद्यापीठांशी संलग्न एकूण ५३  औषधनिर्माण शास्त्र पदवी अभ्यासक्रमाची महाविद्यालये असून, ७६ महाविद्यालयांध्ये औषधनिर्माण शास्त्र पदविकेचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकStudentविद्यार्थीcollegeमहाविद्यालयHSC Exam Resultबारावी निकाल