वडाळीभोई : वडाळीभोई येथे आदिशक्ती महिषासुरमर्दिनी जगदंबा मातेची सवाद्य मिरवणूक काढण्यात येऊन नवरात्रोत्सवाची सांगता करण्यात आली. नऊ दिवस आदिशक्तीचा जागर करून विजयादशमीला नवरात्रोत्सवाची सांगता झाली. नवरात्रीसाठी घराघरात घटस्थापना करून नऊ दिवस उपवासाचे व्रत करून तर काही महिला व तरुणांनी अनवाणी पायाने राहून आदिशक्तिची उपासना केली. यावेळी वडाळीभोई येथे संभाजी राजे मित्रमंडळ, हिंदू स्वराज्य ग्रुप, सप्तशृंगी मित्रमंडळ, एकलव्य मित्रमंडळ सरस्वती मित्रमंडळ, सोमेश्वर मित्रमंडळ, सरस्वती मित्रमंडळ, दुर्गा माता मित्रमंडळ यांनी आकर्षक विद्युत रोषणाई करून गरभा नृत्याचे आयोजन करून परिसर दुमदुमून टाकला.
जगदंबा मातेची सवाद्य मिरवणूक
By admin | Updated: October 6, 2014 00:13 IST