शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक शहरातील बहुचर्चित  कपाटकोंडी फुटणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 01:19 IST

शहरातील बहुचर्चित कपाटकोंडी आता फुटण्याची शक्यता निर्माण झाली असून, आयुक्तांनी स्थायी समितीवर यासंदर्भातील प्रस्ताव सादर केला आहे. त्यामुळे काही हजार इमारतींचा प्रश्न सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नाशिक : शहरातील बहुचर्चित कपाटकोंडी आता फुटण्याची शक्यता निर्माण झाली असून, आयुक्तांनी स्थायी समितीवर यासंदर्भातील प्रस्ताव सादर केला आहे. त्यामुळे काही हजार इमारतींचा प्रश्न सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  गेल्या तीन ते चार वर्षांपासून कपाटकोंडीचा विषय गाजत आहे. इमारतीचे बांधकाम करताना कपाट बांधण्यासाठी असलेली जागा वेगळी ठेवल्यास ती मुक्त असतानादेखील सहा हजार इमारतींमध्ये कपाटाची जागा सदनिकेत समाविष्ट करण्यात आली आहे. त्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला आहे. अशाप्रकारचे काम करताना काही प्रमाणात अनियमित कामे करण्याची तरतूद आहे, परंतु अशा शिथिल नियमावलीपेक्षा अधिक बांधकाम करण्यात आल्याने अशा इमारतींना पूर्णत्वाचे दाखले देण्यासच महापालिकेने नकार दिला आहे. महापालिकेच्या नगररचना विभागाचे सहायक संचालक शेंडे रुजू असताना हा प्रकार उघड झाला. त्यावेळी असलेले आयुक्त प्रवीण गेडाम यांनी नियमितीकरणास नकार दिला.  त्यानंतर विकासकांच्या संघटनांनी मंत्रालयाचे उंबरठे झिजवले, परंतु हा प्रश्न सुटलेला नाही.  दरम्यान, मध्यंतरी मंत्रालयातील एका बैठकीत यावर तोडगा काढण्यात आला होता. परंतु हा अत्यंत संदिग्ध आणि कायद्यात बसविण्याविषयी शंका निर्माण करणार होता. सहा मीटर तसेच साडेसात मीटर कॉलनीरोड असलेल्या ठिकाणच्या इमारती यामुळे अडचणीत असल्याने भविष्यात ज्या कोणाला बांधकाम करायचे असेल त्याला एकूण नऊ मीटर रस्ता रुंदीच्या हिशेबाने जागा सोडावी लागणार आहे. बांधकाम नियमावलीच्या कलम २१० मध्ये अशाप्रकारची तरतूद शोधून आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मार्च महिन्यात अधिसूचना जारी करून त्यावर हरकती व सूचना मागवल्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार त्याला अल्प प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आलेल्या हरकतींची आयुक्तांनी सुनावणी घेतली आणि ती पूर्ण केली तरी अंतिमत: स्थायी समितीवर प्रस्ताव मांडण्यासाठी आचारसंहितेचा अडसर होता. आधी विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य मतदार संघ आणि त्यानंतर शिक्षक मतदारसंहितेच्या आचारसंहितेमुळे हा विषय रखडला होता. परंतु आता मात्र आयुक्तांनी हा प्रस्ताव स्थायी समितीवर पाठविण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळेच त्याबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.विकासकांच्या भेटीगाठी चर्र्चामहापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत कपाटकोंडी फुटणारा प्रस्ताव दाखल होणार असून, तसे ज्ञात झाल्यानंतर अनेक नगरसेवकांनी विकासकांना बोलावून चुचकारण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. आयुक्तांनी सदरचा प्रस्ताव पाठविला तरी फेटाळण्याचा अधिकार असल्याचा दावा करीत संबंधितांनी वेगळीच बोलणी सुरू केल्याची चर्चा पालिका वर्तुळात आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका