शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
3
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
5
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
8
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
9
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
10
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
11
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
12
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
13
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
14
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
15
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
16
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
17
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
18
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
19
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

सत्ताधाऱ्यांनी केला सत्तेचा सर्वाधिक दुरुपयोग ! :शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 02:14 IST

कारखाने बंद पडतायत, नोकºया जातायत, मंदी रोखण्यात सरकार अपयशी ठरतंय. कुणी आवाज उठवला, विरोध केला की खटले भरून ईडीच्या नोटिसा देण्याचे काम सध्याचे सत्ताधारी करीत आहेत. सामान्यांचा आवाज दाबून टाकण्यासाठी सत्तेचा जितका दुरुपयोग या सरकारने केला, तितका कुणीच केला नव्हता. असा सत्तेचा दुरुपयोग करणाऱ्यांना सत्तेवरून खाली खेचा, असा घणाघात राष्टÑवादी कॉँग्रेसचे नेते शरद पवार यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर केला.

ठळक मुद्देमखमलाबाद, सिडको येथे जाहीरसभा

नाशिक : कारखाने बंद पडतायत, नोकºया जातायत, मंदी रोखण्यात सरकार अपयशी ठरतंय. कुणी आवाज उठवला, विरोध केला की खटले भरून ईडीच्या नोटिसा देण्याचे काम सध्याचे सत्ताधारी करीत आहेत. सामान्यांचा आवाज दाबून टाकण्यासाठी सत्तेचा जितका दुरुपयोग या सरकारने केला, तितका कुणीच केला नव्हता. असा सत्तेचा दुरुपयोग करणाऱ्यांना सत्तेवरून खाली खेचा, असा घणाघात राष्टÑवादी कॉँग्रेसचे नेते शरद पवार यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर केला.सिडकोतील पवननगरला नाशिक पश्चिमचे राष्टÑवादी कॉँग्रेस-कॉँग्रेस आघाडीचे उमेदवार अपूर्व हिरे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री प्रशांत हिरे, उमेदवार डॉ. अपूर्व हिरे, देवीदास पिंगळे, नाना महाले, जयवंत जाधव, रवींद्र पगार, रंजन ठाकरे, गजानन शेलार, लक्ष्मण जायभावे, अर्जुन टिळे, डॉ. शोभा बच्छाव, करण गायकर आदी मान्यवर उपस्थित होते. बोलताना पवार यांनी यावेळी १९८५ सालासारखी परिस्थिती दिसत असून, यावेळीदेखील संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील जागा निवडून येतील, असा विश्वास व्यक्त केला. राज्य आणि केंद्र सरकारने सामान्य जनतेची कोणतीच कामे केली नाहीत. त्यामुळेच जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठीच मग कलम ३७० सारख्या मुद्द्यांचा वापर केला जात असल्याचे पवार यांनी नमूद केले.गत ५ वर्षांत १६ हजार शेतकºयांनी आत्महत्या केली. ज्या शेतकºयांची २-४ लाखांची कर्ज थकतात, त्यांना नोटिसा पाठवून बेअबु्र करता आणि कोट्यवधींची उद्योजकांची कर्जे, राष्टÑीयीकृत बॅँकांची देणी माफ करून टाकता हा सामान्यांवर मोठा अन्याय आहे. तो बंद केल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. त्याआधी भुजबळ यांनीदेखील राज्याच्या कारभारावर घणाघाती हल्ला चढवला. तसेच या सरकारने केवळ खोटी आश्वासने देण्याचे काम केले असल्याचा आरोप केला. तर अपूर्व हिरे यांनी एचएएल, स्थानिक बेरोजगारीच्या मुद्द्यांमुळे परिवर्तन निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला.दत्तक बापापेक्षा गरीब बाप बरा...मखलाबाद येथे झालेल्या सभेत देखील शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. शहर दत्तक घेऊन कोणतेही मुख्यमंत्र्यांनी कोणतेही काम केले नाही. नाशिकमधील उद्योगधंदे बंद पडले असून, उद्योजक, कामगार, शेतकºयांचे प्रश्न निर्माण झाले असताना यासंबंधी मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला की ते देशभक्तीच्या घोषणा देऊन मुद्द्यांवरून लक्ष वळविण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अशा परक्या दत्तक बापापेक्षा आपला गरीब बापच बरा, अशी टीका पवार यांनी केली. मी कुस्तीगीर परिषदेचा अध्यक्ष आहे. आमचा रेवड्यांची कुस्ती खेळणारा पोरगंही त्यांना सरस ठरेल, असं असताना मुख्यमंत्री म्हणतात त्यांना समोर कोणी पहिलवानच दिसत नाही अशी टीकाही त्यांनी केली. आपण काहीच केले नाही अशी टीका सध्या केली जाते मग पन्नास-पंचावन्न वर्षात काही तरी काम केले असल्यानेच सरकारने आपल्याला पद्म पुरस्कार दिला असेल ना असेही ते म्हणाले.हिरे घराण्याकडे सेवेचा वारसाभाऊसाहेब हिरे, व्यंकटराव हिरे, पुष्पाताई हिरे, प्रशांतदादा हिरे असा समाजसेवेचा मोठा वारसा हिरे घराण्याकडे आहे. स्वत: अपूर्व यांनीदेखील विधीमंडळात नाशिक जिल्ह्याचे अनेक प्रश्न मांडण्याचे काम अत्यंत चांगल्या पद्धतीने केले. त्यामुळे यावेळी सेवेचा वारसा असलेला उमेदवार निवडण्याची संधी तुम्हाला असल्याचे सांगून पवार यांनी अपूर्व यांना विजयी करण्याचे आवाहन केले.गोदाकाठी गाजरविक्रीछगन भुजबळ यांनी यावेळी नेहमीच्या शैलीत सरकारवर जोरदार टीका केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा गोदाकाठी भाजीबाजार मैदानावर होत असल्याचा संदर्भ घेऊन भुजबळ यांनी नाशिकचा बाजार नेहमी बुधवारी भरतो, मात्र आज चक्क गुरुवार असताना देखील गोदाघाटावर बाजार भरला आहे. या बाजारात गाजर विक्री सुरू आहे, असे सांगून फडणवीस यांच्या सभेची खिल्ली उडवली.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस